Bollywood Kissa in Marathi : भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी त्यांच्या अभिनय आणि सौंदर्याने अमिट छाप सोडली आहे. जर नाव घ्यायचे झाले तर मधुबाला, मीना कुमारी, वैजयंती माला, साधना आणि मुमताज या अभिनेत्रींनी त्यांच्या कारकीर्द चमकदार कामगिरी केली आहे. यामध्ये अजून एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घ्यायला हवं कारण या अभिनेत्रीचा 1973 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपट तब्बल 9 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ माजली होती. या फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली आज कोट्यवधीची मालकीण आहे.
खरं तर, आम्ही बोलत आहोत करीना कपूर खानच्या सासूबाई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याबदद्ल, ज्या त्याच्या काळातील सुपरहिट अभिनेत्री होत्या. शर्मिला यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये 'आराधना' आणि 'मेरे हमसफर' सारखे हिट चित्रपट दिले आहेत. शर्मिला यांनी राजेश खन्ना, धर्मेंद्र आणि जितेंद्र यांसारख्या स्टार्ससोबतही काम केलं आहे. 51 वर्षांपूर्वी शर्मिलाने हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हटल्या जाणाऱ्या राजेश खन्नासोबत 'दाग' चित्रपटात धमाका केला होता. 'दाग' चित्रपट दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता.
राजेश खन्ना आणि शर्मिला यांचा 'दाग' हा सुपरहिट चित्रपट 1973 साली 9 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्यासोबत राखीही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. 'दाग'च्या निर्मात्यांनी हा चित्रपट फक्त काही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याची योजना आखली होती, मात्र हा चित्रपट इतका मोठा ब्लॉकबस्टर ठरेल असे कोणालाही वाटलं नव्हतं. विशेष म्हणजे 'दाग'च्या कथेबाबत निर्माते आणि चित्रपट वितरकांना विश्वास नव्हता. 'दाग'पूर्वी राजेश खन्नाचे काही चित्रपट चालले नाहीत, पण 'दाग'ने संपूर्ण कथाच बदलून टाकली. 'दाग'मधील शर्मिला टागोर यांचं सौंदर्य आणि अभिनय लोकांना आवडला होता. या चित्रपटानंतर शर्मिला यांना वेगळी ओळख दिली.