'कुत्र्यासोबत सेक्स करशील?' अभिनेत्रीला साजिदचा प्रश्न

...तरीही त्याचं विचित्र प्रश्न विचारणं सुरुच होतं

Updated: Nov 2, 2018, 10:43 AM IST
'कुत्र्यासोबत सेक्स करशील?' अभिनेत्रीला साजिदचा प्रश्न

मुंबई : 'लिपस्टीक अंडर माय बुरखा' आणि बऱ्याच वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं प्रेम मिळवणाऱ्या अभिनेत्री आहाना कुमरा हिने कलाविश्वात आपलं असं वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. पण, सध्या बी- टाऊनमध्ये सुरु असणाऱ्या #MeToo च्या चर्चा पाहता आहानालाही या साऱ्याचा सामना करावा लागला होता, ज्या गोष्टीमुळे तिला नैराश्याचा सामना करावा लागला होता. 

किंबहुना साधारण पाच एक वर्षांपूर्वीच्या परिस्थितीमुळे आपल्याला आत्महत्या करावंसं वाटत असल्याचा खळबलजनक कुलासाही तिने केला. 

कलाविश्वात असणाऱ्या वातावरणाशी पाच वर्षांपूर्वी मी प्रचंड निराश झाले होते. अनेकांसाठी बी- टाऊनमध्ये काही गोष्टी अगदी सोप्या आणि इतक्या सवयीच्या कशा असू शकतात याचच विचार मी वारंवार करत  असल्याचं ती म्हणाली. त्या साऱ्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आहानाने बराच वेलही घेतला होता. 

बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान आणि टॅलेंट मॅनेजर अनिर्बन ब्लाह यांच्या वर्तणूकीवरुन तिने पडदा उचलला. 

'बॉम्बे टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत तिने हा खुलासा केला. 'अभिनयावर जास्त भर देण्यापेक्षा दिसण्यावर जास्त लक्ष दे', असं सांगणारे बरेच दिग्दर्शनक कलाविश्वात आहे, असं ती म्हणाली. शिवाय जासिदने एकदा आपल्याला तू बिकिनीमध्येही अगदी हॉट दिसशील असा मेसेज केल्याचा गौप्यस्फोट तिने केला. 
अनिर्बन ब्लाह याने एकदा आपल्याला हॉटेलमध्ये एक खोली आहे, तिथे जाऊन आपण चर्चा करु, अशी विचारणया केल्याचं तिने उघड केलं. 

वर्षभरापूर्वी दिग्दर्शक साजिद खान याच्यासोबत झालेल्या मुलाखतीतील काही गोष्टीसुद्धा तिने या मुलाखतीत सांगितल्या. 'साजिद कसा माणूस आहे हे माहित असूनही मी त्याला भेटण्यासाठी गेले होते. मी त्याला भेटले आणि सलोनीने जसं लिहिेलं अगदी तो  त्याच प्रकारे तेव्हा माझ्याशी वागला होता. आई बाहेर असल्यामुळे तिला त्रास होऊ नये हे कारण देत त्याने मला त्याच्याच खोलीत बसवलं. तिथे बराच अंधार होता. त्यामुळे मी त्याला लाईट लावण्यास सांगितलं. तो माझ्याशी बोलू इच्छित होता. माझी आई पोलीस अधिकारी असल्याचं मी त्याला सांगितलं पण, तरीही त्याचं विचित्र प्रश्न विचारणं सुरुच होतं', असं आहाना म्हणाली. 

'मी तुला १०० कोटी रुपये दिले तर, तू कुत्र्यासोबत सेक्स करशील? असा विकृत प्रश्न त्याने तिला विचारला. त्याच्या घाणेरड्या आणि अश्लील विनोदांवर मी हसावं अशी त्याची अपेक्षा होती', अशा शब्दांमध्ये आहानाने साजिदच्या वक्तव्याविषयी नाराजी व्यक्त केली.

साजिद आणि अनिर्बन यांच्याविषयी आपण फार आधीच या गोष्टी उघड करणार असल्याचंही तिने सांगितलं. कलाविश्वात आपल्याला जितका चांगला अनुभव आला तितकाच वाईट अनुभवही आला. मुख्य म्हणजे इथे आपल्याला चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधीही मिळाली, असंही तिने यावेळी स्पष्ट केलं.