Doctor G Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना त्याच्या चित्रपटामधून सामाजिक समस्या मांडण्यासाठी ओळखला जातो. अशातच आयुषमान नवी कथा घेऊन आला आहे. 'डॉक्टर जी' असं चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात चांगलं कलेक्शन केलं असून येत्या आठवड्यात चित्रपटाचं भवितव्य ठरणार आहे. (Bollywood Movie Doctor G Box Office Collection Marathi News)
'डॉक्टर जी' चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये एकूण 15.03 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. शनिवार आणि रविवारी या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सांगितले की, आयुष्मानच्या 'डॉक्टर जी'ने रविवारी एकूण 5.94 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. याआधी या चित्रपटाने शनिवारी ५.२२ कोटी आणि शुक्रवारी 3.87 कोटींचा व्यवसाय केला होता. हे एकत्र करून, चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये एकूण 15.03 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटासाठीचे खरे आव्हान सोमवारपासून सुरू होणार आहे.
#DoctorG clocks a respectable weekend total... Ample growth on Day 2 and 3 gives it a strong chance... Day 4 is the decider, will give an indication of its journey ahead... Fri 3.87 cr, Sat 5.22 cr, Sun 5.94 cr. Total: ₹ 15.03 cr. # biz. pic.twitter.com/pUDowTN02d
— taran adarsh (@taran_adarsh) October 17, 2022
चित्रपटाची कथा काय आहे
डॉक्टर जी या चित्रपटात स्त्रीरोग तज्ज्ञच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दाखवण्यात आल्या आहेत. विनीत जैन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात आयुष्मान आणि रकुल प्रीत सिंह यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अनुभूती कश्यप यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.