दुसऱ्या आठवड्यातील 'साहो'च्या कमाईवर विश्वासच बसणार नाही

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता प्रभास यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'साहो' या चित्रपटाच्या प्रदर्शापूर्वीपासूनच सर्वत्र चर्चा आणि उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळत होतं. 

Updated: Sep 10, 2019, 10:03 AM IST
दुसऱ्या आठवड्यातील 'साहो'च्या कमाईवर विश्वासच बसणार नाही

मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता प्रभास यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'साहो' या चित्रपटाच्या प्रदर्शापूर्वीपासूनच सर्वत्र चर्चा आणि उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळत होतं. परिणामी, विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पहिल्याच आठवड्याअखेर याचे पडसाद कमाईच्या आकड्यांवर पाहायला मिळाले. 

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अशा चित्रपट जगतातील अनेक कलाकारांची वर्णी लागलेल्या या चित्रपटाची स्टारकास्ट एका अर्थी चित्रपटासाठी तारणहार ठरली. पण, दुसऱ्या आठवड्यात मात्र या सर्व गोष्टी जादू दाखवू शकल्या नाहीत. प्रदर्शनानंतरच्या दुसऱ्या आठवड्यात 'साहो'च्या कमाईचा वेग चांगलाच मंदावला. पहिल्या आठवड्याअखेर जेथे हे आकडे ११५ कोटींच्या घरात होते, तोच दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत साहोने अवघ्या ३.५० कोटींचीच कमाई केली होती. आठवड्याअखेर या आकड्यांनी फक्त ६.२५ कोटींचाच आकडा गाठला. 

 
 
 
 

A post shared by Prabhas (@actorprabhas) on

'बाहुबली' फेम प्रभासच्या 'साहो'ची ही पडझड पाहता, चित्रपट निर्माते आणि कलाकारांसाठी ही एक चिंतेची बाब ठरत आहे. चित्रपटाने आतापर्यंत जमवलेला गल्ला आणि एकंदर आकडेवारी पाहता जवळपास यामध्ये एकूण ८० टक्के घट पाहायला मिळत आहे. 'साहो'ची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच, प्रदर्शनानंतर मात्र समीक्षकांनी या चित्रपटाविषयी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. तरीही प्रभासच्या लोकप्रियतेच्या बळावर पहिल्या आठवड्यात 'साहो'च्या गल्ल्यात चांगली भर पडली. पण, दुसऱ्या आठवड्यात मात्र हे सातत्य पाहायला मिळालं नाही.