अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडालेले यश चोप्रा, पण....

तिच्या प्रेमात चोप्रा यांनी काही मोठे निर्णयही घेतले होते. 

Updated: Sep 27, 2019, 02:03 PM IST
अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडालेले यश चोप्रा, पण....  title=
अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडालेले यश चोप्रा, पण....

मुंबई : हिंदी कलाविश्वात प्रत्येक कलाकाराने त्यांच्या परिने कायमच अतीव महत्त्वाचं योगदान दिलं आहे. यामध्ये चित्रपट दिवंगत चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या नावाचा विशेष उल्लेख केला जातो. चोप्रा यांनी त्यांच्या दिग्दर्शन कारकिर्दीत 'प्रेम' या एका शब्दाला विविध चित्रपटांतून तितक्याच वेगळेपणाने मांडलं. रोमांसचा बादशहा म्हणून त्यांना आणि त्यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या चित्रपटांना कायमच प्रेक्षकांची पसंती मिळाली. असे हे दिग्दर्शक त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही कायमच चर्चेत राहिले. 

एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्री मुमताज यांच्याशी त्यांचं नाव जोडलं गेलं होतं. मुमताज आणि यश चोप्रा या दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम होतं. किंबहुना ते विवाहबंधनातही अडकणार होते. त्यावेळी ते एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करत होते. इतकंच नव्हे, तर असं म्हटलं जातं की मुमताज यांच्यावरील प्रेमाखातर त्यांनी आपल्या 'आदमी और इंसान' या चित्रपटामध्ये सायरा बानो यांच्याऐवजी मुमताच यांना संधी दिली होती. 

या चित्रपटात सायरा बानो या मुख्य भूमिकेत, तर मुमताज या सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेत होत्या. पण, त्यांच्याप्रती असणाऱ्या प्रेमाखातर यश चोप्रा यांनी मुमताच यांनी चित्रपटातील भूमिका वाढवली, सोबत एक गाणंही त्यांच्या वाट्याला आलं. सायरा बानो या चित्रपटातून विशेष छाप पाडू शकल्या नाहीत. याच चित्रपटाच्या माध्यामातून मुमताच या सहायक अभिनेत्रीपासून मुख्य अभिनेत्री झाल्या, प्रकाशझोतात आल्या. सोबतच प्रकाशझोतात आलं ते म्हणजे यश चोप्रा आणि मुमताज यांचं प्रेमप्रकरण. 

'एशियानेट न्यूज'च्या वृत्तानुसार असं म्हटलं जातं की, यश चोप्रा आणि मुमताज यांचं नातं पाहता चोप्रा यांच्या कुटुंबाकडून मुमताज यांच्या कुटुंबाशी त्यांच्या लग्नाविषयीही बोलण्यात आलं. त्यावेळी चित्रपटसृष्टीत मुमताज यांच्या करिअरने चांगलाच वेग पकडला होता. अशा वेळी त्यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी या विचारांना मुमताज यांच्या कुटुंबीयांचा नकार होता. त्यामुळे हे नातं पुढे जाऊच शकलं नाही. 

Image result for mumtaz actress zee

मुमताज आणि यश चोप्रा यांचं नातं एका अपूर्ण कहाणीप्रमाणेच राहिलं. ज्यानंतर यश चोप्रा यांनी पॅमेला सिंग यांच्याशी लग्नगाठ बांधली. तर, पुढे कारकिर्दीत अपेक्षित यश मिळवल्यानंतर मुमताज यांनीही एका व्यवसायिकाशी लग्न करत आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली.