'या' व्यक्तीसोबत सारा अली खान करतेय रोमान्स; पसर्नल Video व्हायरल

रोमान्स करताना अभिनेत्री सारा अली खान कॅमेरात कैद; अभिनेत्रीसोबत कोण आहे हा व्यक्ती?

Updated: Sep 8, 2022, 01:07 PM IST
'या' व्यक्तीसोबत सारा अली खान करतेय रोमान्स; पसर्नल Video व्हायरल title=

Sara Ali Khan Dance Video: अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सारा अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकताच सारा अली खानने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सारा अली खान तिच्या हेअरस्टाइलिस्टसोबत रोमँटिक अंदाजामध्ये डान्स करताना दिसत आहे. मात्र यावरून ती ट्रोलही होत आहे.

व्हिडीओमध्ये सारा अली खान तिच्या हेअर स्टायलिस्टसोबत 'बाहों में चले आ' गाण्यावर रोमँटिक स्टाईलमध्ये डान्स करत आहे. व्हिडीओमध्ये, जिथं हेअरस्टाइलिस्ट साराचे केस ग्रूम करत असताना सारा रोमान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सारा अली खानने ऑरेंज कलरचा लेहेंगा घातला आहे. 

व्हिडीओच्या पुढच्या भागात, सारा अली खान 'टिंकू जिया' गाण्यावर त्याच हेअरस्टायलिस्टसोबत डान्स करत आहे.  सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या तिचा आगामी चित्रपट 'गॅसलाइट'मध्ये (Gaslight) व्यस्त आहे. या चित्रपटात अभिनेता विक्रांत मॅसीही आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार पवन कल्याणही दिसणार आहे. त्यानंतर लक्ष्मण उतेकरच्या पुढील चित्रपटात सारा दिसणार आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत असणार आहे.