Neha Kakkar ची बहीण दिसते तिच्याहून सुंदर; गाण्यातही देते बहिणीला टक्कर

तरीही इथवर पोहोचण्य़ाचा तिचा प्रवास फारसा सोपा नव्हता.   

Updated: Oct 20, 2021, 01:12 PM IST
Neha Kakkar ची बहीण दिसते तिच्याहून सुंदर; गाण्यातही देते बहिणीला टक्कर  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : चेहऱ्यावर असणारं स्मितहास्य आणि दिलखेचक आवाजाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या नेहा कक्कर हिच्या लोकप्रियतेविषयी वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही. नेहा आता प्रसिद्धीझोतात असली, तरीही इथवर पोहोचण्य़ाचा तिचा प्रवास फारसा सोपा नव्हता. 

भाऊ- बहिणींसोबत नेहा देवीच्या जगरातामध्ये गाणी गायची. भाऊ-बहिणीचं हे त्रिकूट पाहता पाहता बॉलिवूडमध्ये त्यांच्या कलेच्या बळावर पुढे आलं. नेहाला संधी मिळत गेली आणि तिनं या संधीचं सोनं केलं. तिथं तिची बहीण आणि भाऊसुद्धा त्यांच्या परीनं गायनकला जोपासत होते आणि आहेत. नेहा कितीही लोकप्रिय झाली असली तरीही तिनं आपल्या बहिणीलाही याचं श्रेय कायमच दिलं आहे. 

नेहाची बहीणही तिच्याचइतकी, किंबहुना तिच्याहूनही सुंदर दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून बहिणींची ही जोडी अनेकदा पाहायला मिळते. आपण बहिणीकडून खूप काही शिकले असल्याचं म्हणत नेहानं बहिणीसोबतचे काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. निमित्त आहे, ते म्हणजे सोनू कक्करचा वाढदिवस. 

बहिणीचं आपल्या जीवनात असणारं स्थान नेमकं किती महत्त्वाचं आहे, हेच नेहानं तिच्या या पोस्टमधून व्यक्त केलं आहे. तिच्या या पोस्टला असंख्य लाईक्स मिळाल्या असून, कमेंटमध्ये नेहाच्या बहिणीला अनेकांनीच वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.