मुंबई : अभिनेत्री कल्कीने केक्ला हिने नुकताच एका मुलीला जन्म दिला. कल्की आणि तिचा साथीदार Guy Hershberg यांच्या जीवनात या मुलीच्या निमित्ताने जणू आनंदाचीच उधळण झाली. कल्कीने सॅफो असं नाव ठेवत तिच्या मुलीला नवी ओळख दिली. आपल्या प्रियकरासोबतच्या नव्या प्रवासाची सुरुवात करणारी हीच कल्की तिच्या मुलीच्या जन्माआधी एका अशा निर्णयावर पोहोचली होती, ज्याचा कोणीही विचार केला नव्हता.
आपण वॉटर बर्थ, या पद्धतीने बाळाची प्रसूती करणार असल्याचं कल्कीने फार आधीच काही मुलाखतींमध्ये सांगितलं. तिच्या या निर्णय़ाचं सर्व स्तरांतून स्वागतही झालं. पण, प्रसूतकळा आणि बाळाच्या जन्माच्या काही तासांपूर्वीच कल्की पूर्णपणे थकली होती. अखेर परिस्थितीपुढे हात टेकत तिने डॉक्टरांना एक विनंती केली.
एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून कल्कीने याविषयीची माहिती दिली. 'मी या संपूर्ण टीमची आभारी आहे', असं म्हणत आपल्या मुलीच्या जन्मासाठी कोणताही चुकीचा निर्णय घेऊ न देणाऱ्या डॉक्टरांचे तिने आभार मानले. '१७ तास... मी प्रचंड थकल्यानंतर अक्षरश: कोणत्याही परिस्थितीत आता बाळाला हबाहेर काढा अशी विनवणी डॉक्टरांना केली. पण, त्यांनी स्पष्ट नकार दिला. तू इथवर पोहोचली आहेस, आता नैसर्गिक पद्धतीनेच तू बाळाला जन्म देशील.... असं त्यांनी सांगितलं. तासाभरानंतरच सॅफोचा जन्म झाला होता. तुम्ही सारेच एका चमत्काराप्रमाणे आहात....', असं लिहित कल्कीने तिच्या प्रसूतीच्या काळात मदत केलेल्या आणि पावलोपावली साथ दिलेल्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
'बेसन बर्फी' बनवत नव्वदीपार आजीबाईंनी सुरु केला स्टार्टअप
सोशल मीडियावर तिने काही फोटोही शेअर केले. ज्यामध्ये Guy आणि कल्की अतिशय आनंदात दिसत असून, त्यांच्या या लहानशा कुटुंबात एका नव्या पाहुणीच्या येण्याने आता अदभूत क्षणाची बरसात होणार असं म्हणायला हरकत नाही.