'पानिपत' आणि 'पती पत्नी और वो' चित्रपटांमध्ये कांटे की टक्कर

पहिल्या दिवशी 'पती पत्नी और वो' चित्रपटाने बाजी मारली आहे. 

Updated: Dec 7, 2019, 10:14 AM IST
'पानिपत' आणि 'पती पत्नी और वो' चित्रपटांमध्ये कांटे की टक्कर title=

मुंबई : दोन चित्रपट एकत्र रूपेरी पडद्यावर दाखल झाले तर चात्यांसाठी कोणाता चित्रपट पाहायला जावा असा प्रश्न असतो. तर या शुक्रवारी चित्रपट प्रेमींनी अभिनेता कार्तिक आर्यन स्टारर 'पती पत्नी और वो' चित्रपटाला कौल दिल्याचं दिसून येत आहे. रूपेरी पडद्यावर दाखल होताच 'पती पत्नी और वो' चित्रपटाने पहिल्या दिवशी ९ कोटींपर्यंत मजल मारली आहे. तर ऐतिहासिक कथेच्या जोरावर साकारण्यात आलेल्या 'पनिपत'ने ४ कोटी रूपयांचा गल्ला जमा केला. 

एकंदर पाहता पहिल्या दिवशी 'पती पत्नी और वो' चित्रपटाने बाजी मारली आहे. तर आता विकएण्डला कोणत्या चित्रपटाप्रती चाहते आपले प्रेम व्यक्त करतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. 

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी दोन्ही चित्रपटांना तीन स्टार दिले आहेत. १९७८ साली प्रदर्शित झालेल्या ‘पती,पत्नी और वो’ चित्रपटाने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या चित्रपटामध्ये संजीव कुमार, विद्या सिन्हा, रंजीता कौर हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते.  

'पती पत्नी और वो' चित्रपटात कार्तिक शिवाय अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे देखील भूमिका साकारत आहे. चित्रपटात भूमी त्याच्या पत्नीची तर आनन्या त्याच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसत आहे.

तर 'पानिपत' चित्रपटात अभिनेता अर्जुन कपूर, संजय दत्त आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाचे दग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले आहे. आता येत्या काळात कोणता चित्रपट चाहत्यांचे मनोरंजन करण्यास अव्वल ठरेल हे पाहंणे मजेशीर ठरणार आहे.