'से रा नरसिंहा रेड्डी' आणि 'वॉर' चित्रपटांमध्ये काँटे की टक्कर

'मारना मारना महत्व नही, महत्व हैं जितना'   

Updated: Oct 5, 2019, 03:36 PM IST
'से रा नरसिंहा रेड्डी' आणि 'वॉर' चित्रपटांमध्ये काँटे की टक्कर  title=

मुंबई : सध्या चित्रपटगृहांबाहेर 'से रा नरसिंहा रेड्डी' आणि 'वॉर' चित्रपटांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन स्टारर 'से रा नरसिंहा रेड्डी' चित्रपटने अभिनेता ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या 'वॉर'ला मागे टाकले आहे. २७५ कोटी रूपयांच्या बजेट मध्ये साकारण्यात आलेल्या 'से रा नरसिंहा रेड्डी' चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. 

पहिल्यादिवशी ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'वॉर'ची कमाई दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मंदावलेली दिसत आहे. आता २ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीच्या मुहूर्तावर हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते.  

या जमीनीवर ज्यांनी जन्म घेतला आहे, त्यांचं फक्त एकच लक्ष्य असलं पाहिजे आणि ते म्हणजे स्वतंत्रता.  ब्रिटीश अक्रमनानंतर कशा प्रकारे सर्व भारतीय एकत्र येवून लढा देतात हे प्रेक्षकांना 'से रा नरसिंहा रेड्डी' चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.    

'वॉर' चित्रपट जवळपास ३ हजार ८०० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. आता येत्या काळात कोणती चित्रपट बाजी मारेल हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.