'तान्हाजी' चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेक कमाई

चित्रपटाची दमदार कमाई...   

Updated: Jan 22, 2020, 05:15 PM IST
'तान्हाजी' चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेक कमाई

मुंबई : 'तान्हाजी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सलग चढत्या क्रमावर आहे. १० जानेवारी रोजी प्रदर्शित हा चित्रपट ऐतिहासिक कथे भोवती फिरताना दिसत आहे. प्रेक्षकांना देखील हा चित्रपट चांगलाच पसंतीस पडलेला आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहाता येत्या काही दिवसात हे आकडे २०० कोटी रूपयांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. 

चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असला तरी, त्याचा कोणताही परिणार बॉक्स ऑफिसवर झालेला दिसून येत नाही. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाच्या कमाईचे आकडे जाहीर केले आहेत. 

'तान्हाजी' प्रदर्शित झाल्यापासून ते आतापर्यंत चित्रपटाने १८३.३४ कोटींच्यावर गल्ला जमा केला आहे. tanhaji 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांनी पकडलेला वेग काही केल्या मंदावण्याचं नाव घेत नाही आहे. 

दीपिकाच्या 'छपाक' या चित्रपटाला बरंच मागे टाकल्यानंतर आता २०० कोटींची विक्रमी कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ही शौर्यगाथा समाविष्ट होते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

दरम्यान, येत्या काळत 'तान्हाजी'ला कंगना रानौत स्टारर 'पंगा' आणि वरुण धवनची मुख्य भूमिका असणाऱ्या 'स्ट्रीट डान्सर ३डी'चं आव्हान असणार आहे. त्यामुळे हे आव्हान पेलत पुढे या चित्रपटाची वाटचाल कशी असणार याकडेही साऱ्यांचं लक्ष असेल.