मुंबई : सुपरस्टार अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांचा टॉयलेट एक प्रेम कथा हा सिनेमा चीनमध्ये धमाकेदार कमाई करतोय. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या माहितीनुसार, चीनमध्ये रिलीजच्या चार दिवसांतच या सिनेमाने ६९.९१ कोटी रुपयांची कमाई केली. तरण आदर्शने ट्विटरवरुन ही माहिती दिली. फिल्म वेबसाईट Bollywoodlife.com च्या माहितीनुसार टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमाची एकूण कमाई १७५. २१ कोटी रुपये झालीये. या सिनेमाने परदेशात आतापर्यंत ९९.९१ कोटी रुपये कमावलेत. याप्रमाणे या सिनेमाची वर्ल्डवाईड कमाई २७५.१२ कोटी रुपये झालेत.
चीनमध्ये या सिनेमाला ११ हजाराहून अधिक स्क्रीन मिळाल्या होत्या. चीनमध्ये मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर अक्षय कुमारनेही ट्वीट करुन ही माहिती दिली. त्याने आपल्या ट्वीटमधून चीनमधील चाहत्यांचे आभार मानलेत.
सामाजिक मुद्दयावर बनलेल्या या सिनेमाला भारतातही खूप प्रेम मिळाले. भारतात या सिनेमाने टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमाने १३४.२२ कोटी रुपयांची कमाई केली. सिनेमाचे दिग्दर्शन श्री नारायण सिंह यांनी केले. बॉलीवूडमधील त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे.