लग्नात विदेशी नवरीने इंडियन डान्स करुन नवऱ्याला दिले खास सरप्राईज...

लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्याती महत्त्वाचा, खास आणि आनंदी दिवस असतो.

Updated: May 18, 2018, 08:26 AM IST
लग्नात विदेशी नवरीने इंडियन डान्स करुन नवऱ्याला दिले खास सरप्राईज... title=

मुंबई : लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्याती महत्त्वाचा, खास आणि आनंदी दिवस असतो. आपल्या लग्नाबद्दल प्रत्येक मुलीचे काहीतरी स्वप्न असते. कपडे, सजावट याबद्दल पूर्वीपासूनच मनसुबे आखलेले असतात. आजकाल लग्नात नवरा-नवरीच्या स्वागतासाठी डान्स करण्याचा ट्रेंड सुरु झालाय. तर काही ठिकाणी खुद्द नवरा-नवरीचं या आनंदाच्या क्षणी डान्स करुन हा दिवस अधिक खास करतात. आता या लग्नातच बघा ना... या लग्नात नवरीने नवऱ्याला असे काही सरप्राईज दिले की, नवऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.

युट्युबवर @ladygypsyfilms ने  एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात नवरी आपल्या नवऱ्यासाठी खास डान्स करते. नवऱ्यासाठी हा डान्स एक सरप्राईज होते. तिचा डान्स पाहुन नवरा इतका खुश झाला की अखेर त्याने तिला उचलून घेतले.

हा व्हिडिओ लेडी जिपसी व्हिडिओग्राफर टीमने शूट केला आहे. या व्हिडिओत नवरीने 'बाजीराव-मस्तानी' सिनेमातील नजर जो तेरी लागी आणि रामलीला सिनेमातील 'धिनतड़ाक धिन तड़ाक' वर बहारदार नृत्य सादर केले.