Guess Who: शाळेतील या फोटोत एक नाही, तर आहेत पाच बॉलिवूड सेलिब्रेटी; तुम्ही ओळखलंत का?

Viral Five Celebrity School Photo: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल फोटोची. यावेळी या फोटोत दिसणारी पाचही लहान मुलं ही लोकप्रिय बॉलिवूड सेलिब्रेटी आहेत. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली असते. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 22, 2023, 07:46 PM IST
Guess Who: शाळेतील या फोटोत एक नाही, तर आहेत पाच बॉलिवूड सेलिब्रेटी; तुम्ही ओळखलंत का? title=
can you guess these five celebs in the school photo latest viral news in marathi

Viral Five Celebrity School Photo: सेलिब्रेटींच्या लहानपणाचे फोटो हे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्यातून सध्या असाच एक फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. हा शाळेतला फोटो आहे. यावेळी या फोटोमध्ये एक नाही तर तब्बल पाच बॉलिवूड सेलिब्रेटी आहेत हा फोटो एका प्रसिद्ध अभिनेत्यानं शेअर केला आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चा रंगलेली आहे. तुम्हाला यातील लहान मुलांना ओळखता येतंय का? हे फारच लोकप्रिय सेलिब्रेटी आहेत. 

हा फोटो 1984 सालातला आहे. फोटोत दिसणारी बॅच ही तेव्हांची आहे. मनेक्जी कूपर एज्युकेशन ट्रस्ट स्कूल सिल्वर जुबलीच्या वेळी काढलेला हा फोटो आहे. या फोटोत तुम्हाला वर्गातील अनेक मुलं दिसतील परंतु यावेळी या फोटोत दिसणारी पाच मुलं आणि त्यांचे चेहेरे हे तुम्हालाही ओळखता येतीलच नाही. हा फोटो यावेळी अभिनेता शर्मन जोशी यानं पोस्ट केला होता. त्याच्या हा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. या फोटोत शर्मन जोशी, दिव्या भारती, फरहान अख्तर, रितेश वाधवानी आणि फिल्म एडिटर आनंद सुबया आहेत. फरान अख्तर, शर्मन जोशी आणि दिव्या भारती हे तिघं एकाच क्लासमध्ये शिकत होते. बॉलिवूडमध्ये हे तिघंही लोकप्रिय सेलिब्रेटी आहेत. दुर्दैवानं आज दिव्या भारती आपल्यात नाही. 

हेही वाचा : 'आपल्या मुलाचा सांभाळ केल्याबद्दल आभार...', एमी स्विकाराल्यानंतर एकता कपूरचा 'या' व्यक्तींसाठी खास मेसेज

त्यावेळी एकाच वर्गात असल्यानं या सर्वांमध्ये चांगलीच बॉन्डिंग होती. दिव्या भारती यांचा जन्म हा 25 फेब्रुवारी 1974 मध्ये मुंबईत झाला होता. शर्मन जोशीचा जन्म देखील मुंबईत झाला होता. ते दोघंही एकाच शाळेत होते. 14 व्या वर्षी अभिनेत्री दिव्या भारती हिनं आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर ती लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्री झाली. 1990 साली 16 वर्षांची असताना तिनं तेलुगू फिल्म बोब्बिलीतून पदार्पण केले होते. त्यानंतर 1992 साली विश्वात्मा हा तिचा चित्रपट प्रचंड गाजला. यात मोठमोठे कलाकार होते. त्यानंतर शोला और शबनम आणि दिवाना असे तिचे चित्रपटही प्रचडं गाजले होते. 

फरान अख्तर हा लोकप्रिय अभिनेता आणि सोबत दिग्दर्शक आहे. शर्मन जोशीचेही अनेक चित्रपट हे गाजले आहेत. त्यातून त्याचा आमिर खान आणि आर. माधवनसोबतचा थ्री इडियड्स हा चित्रपटही प्रचंड गाजला होता. या फोटोखाली नेटकऱ्यांनीही नानाविध कमेंट्स केल्या आहेत. यावेळी नेटकऱ्यांमध्ये याची बरीच चर्चा रंगलेली आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x