'या' अभिनेत्रीकडून ब्रेस्टफीडिंग फोटो शेअर, म्हणाली यासाठी मला ट्रोल...

'ही' बॉलिवूड अभिनेत्री सध्या चित्रपटांपासून दूर आहे 

Updated: Jul 30, 2021, 06:52 PM IST
 'या' अभिनेत्रीकडून ब्रेस्टफीडिंग फोटो शेअर, म्हणाली यासाठी मला ट्रोल...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली सध्या चित्रपटांपासून दूर आहे आणि आपल्या तीन मुलांसह वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. सेलिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने नुकतंच तिच्या 9 वर्षांच्या स्तनपानाचे फोटो शेअर केले आणि एक मोठी पोस्ट लिहिली आहे. ती म्हणाली की, 'आजपर्यंत तिला समजू शकलं नाही की, तिला यासाठी ट्रोल का केलं जातंय.

सेलिनाने एक लांबलचक चिठ्ठी लिहिली
या फोटोमध्ये सेलिनाने निळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. आणि ती आपल्या दोन मुलांसोबत दिसली आहे. एक मूल तिच्या मांडीवर आहे आणि दुसरा जवळपास खेळत आहे. हा फोटो खूप ट्रोल झाला होता. सेलिनाने मुलाकडे दुर्लक्ष करण्याबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. इतक्या वर्षानंतर, या ट्रोलिंगमुळे तिचं दुखणं पसरलं आहे. तिने लिहिलं की, 'हा फोटो 9 वर्षांपूर्वी स्टारडस्ट मासिकाच्या इंडिया आवृत्तीसाठी काढण्यात आला होता. हा फोटो शेअर करताना मला वाटलं की, मी माझं सर्वात अनमोल क्षण शेअर करत आहे. यासाठी मला वाईट प्रकारे ट्रोल केलं गेलं हे पाहून मला आश्चर्य वाटलं. खरं तर, मी एक महिन्याच्या जुळ्या मुलांना घेवून दुबईतील पूलसाईडला थंड आणि सनी दिवसाचा आनंद घेत होते.

मला ट्रोल का करण्यात आलं
सेलिना पुढे म्हणाली की, तिने तिच्या जुळ्या मुलांना सी-सेक्शनद्वारे जन्म दिला आहे आणि हा फोटो डिलिव्हरीच्या एक महिन्यानंतर काढण्यात आला आहे. ती उष्णतेमुळे त्रस्त झाली होती आणि तिला फक्त या क्षणाचा आनंद घ्यायचा होता. तिने पुढे लिहिलं की, 'तिला अजूनही समजत नाही की, तिला यासाठी ट्रोल का केलं गेलं? जर तुमचं वजन वाढलं असेल तर तुम्हाला ट्रोल केलं जावू शकतं. पण जर तुमच्या मुलाने मोकळेपणाने तुम्हाला लाथ मारली असेल तर त्याला तुम्ही निष्काळजीपणा म्हणाल का? मी जर काही करत असेन तर त्यासाठी कोणाला विचार करण्याचा हक्क खरच आहे का?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ट्रोलर्सने दिलेला सल्ला
या पोस्टच्या शेवटी, सेलिना म्हणाली की, 'कोणत्याही फोटोच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी, ते फोटो देखील परिपूर्ण असू शकतो किंवा त्यामागे काही आव्हानात्मक स्टोरी असू शकते, जी बर्‍याच अडचणींनी मात केली जाते. त्यावेळी, मला आधी मातृत्वाच्या आनंदापासून स्वतःला विचलित करायचं नव्हतं. पण त्या दिवसाच्या आठवणीने मला हे लिहायला भाग पाडलं. मला अशी इच्छा आहे की, परिपूर्ण आई होण्यासाठी कोणताही मार्ग नाही आणि चांगलं होण्यासाठी बरेच मार्ग आहेत हे लोकांना समजलं असेलच. सेलीनाने 2012मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यात एकाचं नाव विराज आणि दुसर्‍याचं नाव विन्स्टन असं होतं. यानंतर, 2017मध्ये देखील ती जुळ्या मुलांची आई झाली, मात्र त्यामध्ये तिने एक मूल गमावलं.