शेतात 'बेबी डॉल'चा पोस्टर, शेतकऱ्याची कल्पना पाहून तुम्हीही म्हणाल 'ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट'

शेतात सनी लिओनीचा पोस्टर...... 

Updated: Jul 30, 2021, 06:13 PM IST
शेतात 'बेबी डॉल'चा पोस्टर, शेतकऱ्याची कल्पना पाहून तुम्हीही म्हणाल 'ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट'  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : 'बेबी डॉल' म्हणून चित्रपटसृष्टीत नावारुपास आलेल्या अभिनेत्री सनी लिओनी हिच्या चाहत्यांचा आकडा दर दिवशी वाढतच चालला आहे. स्टाईल स्टेटमेंट म्हणू नका, किंवा मग सनीची एखादी मुलाखत, ही बेबी डॉल बोलली आणि चर्चा झाली नाही, असं फार क्वचितच. सध्या ही सौंदर्यवती चर्चेत आहे ते म्हणजे एका भलत्याच कारणामुळे. 

हे कारण म्हणजे, आंध्र प्रदेशातील नल्लोर येथे एका शेतकऱ्यानं आपल्या शिवारातच सनी लिओनीचे पोस्टर लावले आहेत. शेतात सनी लिओनीचा पोस्टर...... ऐकून जरा धक्काच बसतोय ना? पण हे खरं आहे. सोशल मीडियावर या शेतातल्या पोस्टरचे बरेच फोटो व्हायरल होत आहेत. किंबहुना ही आयडियाची कल्पना लावणारा शेतकरीही तितकाच चर्चेत आला आहे. 

Pornography case: Raj Kundra च्या जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी तारीख पे तारीख;  शिल्पाही संशयाच्या भोवऱ्यात 

लाल रंगाच्या बिकिनीमध्ये सनी या पोस्टरवर दिसत असून, तिच्यावर येणाऱ्याजाणाऱ्याच्या नजरा खिळत आहेत आणि तोच हे पोस्टर लावण्यामागचा मुख्य हेतू ठरत आहे. आपल्या शेतातील पिकाला कोणाचीही दृष्ट लागू नये, यासाठी वाटसरुंचं लक्ष विचलित करण्याच्याच उद्देशाने शेतकऱ्यानं ही 'पोस्टरबाजी' केली आहे. 

45 वर्षीय अकिनापल्ली चिनचू रेड्डी यांना सुचलेली ही कल्पना आणि त्यानंतर करण्यात आलेली त्याची अंमलबजावणी सध्या भलतीच चर्चेत आली आहे. त्यामुळं खरंच या शेतकऱ्यासाठी ,ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट', हे गाणं अगदी योग्यरित्या लागू होत आहे.