सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रात महत्त्वाचे बदल

कोणत्याही चित्रपटाच्या सुरुवातीला.... 

Updated: Jan 22, 2020, 09:06 AM IST
सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रात महत्त्वाचे बदल  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोणताही चित्रपट पाहण्यासाठी गेलं असता, किंवा तो टेलिव्हिजनवरही पाहत असताना सुरुवातीला. सीबीएफसीचं म्हणजेच सेन्सॉर बोर्डाचं एक प्रमाणपत्र दिसतं. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणित करण्यात आल्याचं हे प्रतीक. गेली कित्येक वर्ष कोणत्याही चित्रपटाच्या सुरुवातीला या प्रमाणपत्राचं एकच रुप पाहायला मिळत आहे. त्यामध्ये फार काही बदल करण्यात आलेले नाहीत. पण, आता मात्र सेन्सॉरकडूनच प्रमाणित करण्यात येणाऱ्या चित्रपटांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राचं रुप बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नव्या रुपात दिसेल प्रमाणपत्र... 

गेल्या काही वर्षांपासून चित्रपटाच्या सुरुवातीला दिसणारं सेन्सॉरचं प्रमाणपत्र आता बऱ्याच अंशी बदललेलं दिसेल. प्रमामपत्राचं हे नवं रुप खऱ्या अर्थाने सध्याच्या काळाला साजेसं असल्याचंही म्हटलं जात आहे. हे प्रमाणपत्र पूर्णपणे डिजिटल स्वरुपात असेल. सीबीएफसीकडून देशातील नऊ क्षेत्रीय कार्यालयांतून या प्रमाणपत्रांमधील बदलांची अंमलबजावणी करण्याचं सांगण्यात आलं आहे. 

प्रमाणपत्रामध्ये करण्यात आलेले बदल पाहता, ते अधिक युजर फ्रेंडली असणार असल्याची प्रतिक्रिया सीबीएफसी अध्यक्ष प्रसून जोशी यांनी दिली. या प्रमाणपत्रातून आधुनिकतेची झलकही पाहता येणार आहे. 

वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

नव्या प्रमाणपत्रामध्ये एक 'क्यूआर कोड' असेल. ज्यावर क्लिक केलं असता तुम्हाला चित्रपटाशी निगगीड बरीच माहिती समजणार आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातन हा 'क्यूआर कोड' स्कॅन केला असता युजर थेट सीबीएफसीच्या संकेतस्थळावर जाईल. जिथे त्यांना चित्रपटातील कलाकार, श्रेयनामावली, कथा, पटकथा, ट्रेलर, प्रोमो या प्रकारची सर्व माहिती मिळणार आहे. त्यामुळे याच स्क्रिनवर तुम्हाला चित्रपटाचे ट्रेलर आणि प्रोमोसुद्धा पाहता येणार आहेत.