विराटविषयी हे काय म्हणाली कंगना?

 बी- टाऊनची क्वीन तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. 

Updated: Jan 22, 2020, 08:22 AM IST
विराटविषयी हे काय म्हणाली कंगना?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत  kangana ranaut  कायमच तिच्या ठाम भूमिका आणि थेट वक्तव्यामुळे चर्चेचा विषय ठरते. कंगनाचा हाच अंदाज अनेकदा तिला वादाच्या भेवऱ्यातही अडकवून जातो. सध्याही बी- टाऊनची क्वीन तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. 

'पंगा' panga या चित्रपटाच्या निमित्ताने कंगना विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. माध्यमांना मुलाखतीही देत आहे. यापैकीच एका कार्यक्रमात तिने भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूची प्रशंसा केली आहे. हा खेळाडू म्हणजे संघात दमदार कामगिरी करणारा विराट कोहली virat kohli. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटने कंगनावरही छाप पाडली आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

विराटचा क्रिकेटच्या मैदानावरील वावर आणि क्रीडा जगतात असणारं त्याचं स्थान पाहता कंगनाने त्याचा उल्लेख 'पंगा किंग' असा केला आहे. 'मी पंगा क्वीन आहे आणि टीम इंडियात कोणी पंगा किंग असल्यास तो निश्चितपणे विराट कोहलीच आहे. तो निडर आहे, बेधडक आहे. त्याच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक आव्हानासाठी तयार आहे', असं कंगना म्हणाली. 

इतक्यावर न थांबता, विराट आणि मी एकाच दिवशी पुन्हा एकदा पंगा घेणार असल्याचंही ती म्हणाली. आपण चित्रपटगृहात 'पंगा' घेणार, तर विराट क्रिकेटच्या मैदानात हेसुद्धा तिने कार्यक्रमादरम्यान सांगितलं. 

वाचा : 'बेसन बर्फी' बनवत नव्वदीपार आजीबाईंनी सुरु केला स्टार्टअप

कंगनाच्या चित्रपटाविषयी सांगावं, तर तिचा हा चित्रपटही खेळाशी निगडीत आहे. 'पंगा'च्या निमित्ताने कंगना जेसी गिलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्याशिवाय नीना गुप्ता, रिचा चड्ढासुद्धा या चित्रपटातून झळकणार आहेत. वैवाहिक आयुष्यानंतर फक्त कुटुंबाभोवतील आपलं विश्व असणाऱ्या एका महिलेची/ कबड्डीपटूची या खेळातील पुनरागमनाची आणि तिच्या जिद्दीची कथा 'पंगा'च्या चित्रपटाच्या निमित्ताने २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.