Corona Virus : 'चला हवा येऊ द्या'मधील कलाकार मुलीच्या जन्मानंतर दुसऱ्यांदाच भेटला, शेअर केले गोंडस सेल्फी

कोरोनाचा काळ प्रत्येक कलाकारासाठी ख़डतर 

Updated: Apr 21, 2021, 02:29 PM IST
Corona Virus : 'चला हवा येऊ द्या'मधील कलाकार मुलीच्या जन्मानंतर दुसऱ्यांदाच भेटला, शेअर केले गोंडस सेल्फी

मुंबई : कोरोनाचा काळ सगळ्यांसाठीच कठीण आहे. आपल्या जवळच्या माणसांपासूनच लांब राहावं लागत आहे. यामध्ये मराठी कलाकारांचा देखील समावेश आहे. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'चला हवा येऊ द्या.' (Chala Hawa Yeu Dya)  या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत असतात. फक्त हसवण्याचा वसा घेतलेल्या या कलाकारांवर भावनिक वेळ येते तेव्हा. (Chala Hawa Yeu Dya : Ankur Wadhave share Selfie with his Cute Baby Khyati ) 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता अंकुर वाढवेने आपल्या मुलीसोबत गोंडस फोटो आणि भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

अंकुर वाढवेला 18 जानेवारी 2020 रोजी गोंडस मुलगी झाली. या मुलीच्या जन्माच्या दिवशी तो तिला भेटला. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी अंकुर आपल्या लेकीला भेटला आहे. अंकुरने आपल्या मुलीचं नाव ख्याती ठेवलं असून तो तिला 16 एप्रिल रोजी भेटला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankur Vitthalrao Wadhave (@ankur_wadhave_official)

या भेटीनंतर ख्यातीने सुरूवातीला त्याला ओळखलंच नाही. अनोळखी माणसाला पाहून रडावं तसं रडत होती. त्यावेळी अंकुरने चांगलीच शक्कल लढवली. अंकुरने तिच्यासोबत काही सेल्फी काढले. त्यानंतर तीने आपल्या बाबाला ओळखलं आहे. कारण अंकुर आणि ख्याती गेल्या तीन महिन्यात फक्त व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून भेटत आहे. 

कोरोनाचे रूग्ण मुंबईत वाढत चालले आहेत. अशावेळी शुटिंग करत असताना योग्य ती खबरदारी घेणारे कलाकार आपल्या मुलांपासून थोडं लांबच राहणं योग्य समजत आहेत. कोरोनाचा काळ प्रत्येकासाठी कठीण आहे. असं असताना आपल्या लेकीला भेटलेल्या अंकुरच्या चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून जात आहे.