'उसका बॉयफ्रेंड हैं...' पाकिस्तानी रॅपरने आलियावर बनवलं रॅप; आलिया म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. 

Updated: Apr 21, 2021, 12:33 PM IST
'उसका बॉयफ्रेंड हैं...' पाकिस्तानी रॅपरने आलियावर बनवलं रॅप; आलिया म्हणाली...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आलियाच्या हटके अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. आलियाटे चाहते फक्त भारतातचं नाही, तर पकिस्तानात देखील आहेत. पाकिस्तानमधील आलियाच्या एका चाहत्याने तिच्यावर रॅप बनवलं आहे. आलियाच्या चाहत्याचं आणि रॅपरचं नाव मोहम्मद शाह असं आहे. मोहम्मदने आलियावर बनवलेलं रॅप सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. आलियाने गली बॉयमधील ‘बहुत हार्ड’ हा डायलॉग म्हणत पोस्टवर कमेंट केलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Muhammad Shah (@iamtheshah)

मोहम्मदचं हे रॅप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  व्हिडिओत त्याचा मित्र आलियावर रॅप तयार करायला सांगतो. रॅपच्या शेवटी त्याचा मित्र त्याला सांगतो की ‘आलियाचा बॉयफ्रेंड आहे, त्यामुळे जान्हवी कपूरवर रॅप बनवायला सांगत. त्यामुळे मोहम्मद आता लवकर जान्हवीवर रॅप बनवेल यात काही शंका नाही. 

दरम्यान, कोरोनाच्या विळख्यातून सुटल्यानंतर रणबीर आणि आलिया मालदीवला गेले आहेत. रणबीर कपूर मार्च महिन्यात कोरोना संक्रमित झाला होता. त्यानंतर आलियाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. आता दोघंही कोरोनामुक्त झाले आहेत. यानंतर या दोघांना मुंबई एअरपोर्टवर कॅज्युअल लूकमध्ये पाहण्यात आलं.