Chala Hawa Yeu Dya | भारत गणेशपुरे याची बोटं रसवंती मशीनमध्ये अडकली आणि मग पुढे हे घडले...

नोकरी करण्यासाठी माझं मन रमत नव्हतं. मग एक दिवस हे सगळ बंद केलं आणि आईला म्हटलं मी मुंबईला जातो.

Updated: Mar 27, 2021, 06:44 PM IST
Chala Hawa Yeu Dya | भारत गणेशपुरे याची बोटं रसवंती मशीनमध्ये अडकली आणि मग पुढे हे घडले... title=

मुंबई : भारत गणेशपुरे याने मुलाखतीत सांगितलं, ''बाबांचं एकलं BSC Agriculture केलं, पण आता पूर्ण वेळ अभिनेता म्हणून काम करण्याचा विचार केला''. तेव्हा शेवटी मग बाबांची किंवा आईची प्रतिक्रिया काय होती? असे विचारले असता. भारत गणेशपुरे म्हणाला, "त्यावेळेस असं होतं की कुठे शाळेवर मास्तर वैगरे म्हणून काम करण्याचा विचार केला की, काम करण्यासाठी 2 लाख रुपये भरावे लागायचे आणि पैसे भरुन मला काम करायचे नव्हते. मी काही तरी धंदा करेन, पण नोकरी करणे मला जमणार नाही. म्हणून मग मी रसवंती उघडली होती."

आणि अचानक तो अपघात

"पण एक दिवशी अचानक रस काढता काढता माझ्या डाव्या हाताची चारही बोटं त्या मशीनमध्ये गेली. तेव्हा मग मी तो धंदा बंद केला आणि विचार केला की आता मी मुंबईला जातो. कारण नोकरी करण्यासाठी माझं मन रमत नव्हतं. मग एक दिवस हे सगळ बंद केलं आणि आईला म्हटलं मी मुंबईला जातो."

पुढे तो म्हणाला, "त्या वेळेला कोणी नातेवाईक मुंबईला नव्हते मग काय करणार? कुठे रहाणार? हे प्रश्न निर्माण झाले. पण मी म्हंटलं की जाऊयात, बघुयात काय होईल ते. माझ्या मनात विश्वास आणि श्रद्धा होती म्हणून हे शक्य झालं."

भारत गणेशपुरेच्या मते, या क्षेत्रात वाचणं आणि अभ्यास करणे तितकेच महत्वाचे आहे. पण आज कालची मुलं शाळेत किंवा कॅालेजमध्ये एक दोन नाटकं करतात आणि मग या क्षेत्रात येतात. हे क्षेत्र खूप मोठं आहे, खूप पैसा लागलाय त्यात निर्मात्याचा.

दिवसाच्या शुटिंगला जर 3 लाख रुपये खर्च येतो आणि एखाद्या अभिनेत्याने जर 2 तास वाया घालवला तर, निर्मात्याचं 50 हजारचं नुकसान होणार. मग नक्कीच एखादा निर्माता अभिनेता निवडण्या आधी विचार करणारचं. कमी वेळेत मला कोण चांगलं काम करुन देईल त्या माणसाची निर्माता काम करुण घेईल.

चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील मालिकेने अवघ्या मराठी माणसांची मनं जिंकली आहेत, त्यांना मनापासून हसायला लावलं आहे. असं म्हणू या की हसवून हसवून त्यांनी अनेकांचे चांगले चांगले आजार पळवून लावले असतील. अशा माणसांनी ज्यांना महाराष्ट्राला भरभरुन हसवलं, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसवलं अशा सर्व कलाकारांशी बातचित केली आहे, झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी. कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट किस्से सांगितले आहेत.