चला हवा येऊ द्या | प्रजासत्ताक दिन विशेषमध्ये या दिग्गजांची हजेरी

पोस्टमन काकांच्या पत्राने पुन्हा एकदा सगळ्यांना केलं भावनिक

Updated: Jan 21, 2021, 02:56 PM IST
चला हवा येऊ द्या | प्रजासत्ताक दिन विशेषमध्ये या दिग्गजांची हजेरी

मुंबई : कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली ६ वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हवा येऊ द्या मध्ये हा आठवडा प्रजासत्ताक दिन विशेष आठवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम, डॉ. तात्याराव लहाने आणि ग्लोबल पुरस्कारप्राप्त रणजित डिसले गुरुजी' अशा दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. 

विविध क्षेत्रातील हे दिग्गज ह्या विशेष भागात आपले अनुभव व्यक्त करताना दिसतील. प्रजासत्ताक दिन विशेष भाग सोमवार २५ ते बुधवार २७ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता हे विशेष भाग तुम्हाला पाहता येणार आहे.

पोस्टमन काकांचं पत्र यंदा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी मांडलेली शिक्षकांची व्यथा ही गंभीर आहे.

पाहा व्हिडिओ