Sushant First Birth Anniversary: 'या' कारणामुळे सुशांत-अंकिता झाले विभक्त

 2020 हे वर्ष सर्वांसाठी धक्कादायक होतं.   

Updated: Jan 21, 2021, 09:59 AM IST
Sushant First Birth Anniversary: 'या' कारणामुळे सुशांत-अंकिता झाले विभक्त title=

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज हयात नसला तरी त्याच्या आठवणी कायम लोकांच्या स्मरनात राहतील. 2020 हे वर्ष सर्वांसाठी धक्कादायक होतं. या वर्षी सामान्य जनतेसह सेलिब्रिटींनी देखील मोठ्या संकटांचा सामना केला. तर याच वर्षी सुशांतने आत्महत्या करून या जगाचा शेवटचा निरोप घेतला. मात्र सोशल मीडियावर तो आजही जिवंत आहे. मृत्यूनंतर सुशांतचा पहिला वाढदिवस आहे. त्यामुळे ट्विटरवर 'One day for SSR birthday' ट्रेंड करत आहे.

दरम्यान, 'पवित्र रिश्ता' चित्रपटाच्या माध्यामातून घरा-घरात पोहोचलेल्या अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि सुशांतच्या जोडीला चाहत्यांनी चांगलेचं डोक्यावर धरले होते. याचदरम्यान त्यांच्या्तील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. जवळपास 6 वर्ष सुशांत-अंकिता एकमेकांना डेट करत होते. 

2016 रोजी त्यांच्या लग्नाच्या बातम्यांनी देखील जोर धरला. त्यांच्या लग्नाची बातमी ऐकून चाहत्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण होते. मात्र अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगायला लागल्या. त्यानंतर सुशांत आणि अर्चनाने देखील विभक्त झाल्याची कबुली दिली. 

अंकिता सुशांतसोबत लग्न करण्यास तयार होती पण सुशांतला मात्र हे नातं मान्य नव्हतं. करिअरमध्ये पुढे जायचं आहे असं कारण सांगून त्याने अंकितासोबत ब्रेकअप केलं. त्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत तो रिलेशनशीपमध्ये होता. 34 वर्षीय सुशांतने 14 जून 2020 रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेवून स्वतःचे जीवन संपवले. अद्यापही त्याच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.