‘साहो’साठी प्रभासला मिळाले हवे तितके पैसे, श्रद्धाला मिळाले इतके ?

प्रभासच्या आगामी ‘साहो’ सिनेमाची आतापासूनच जोरदार चर्चा रंगली आहे. आतापर्यंत या सिनेमात प्रभासची हिरोईन कोण असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आता त्या सस्पेन्सवरून पडदा उठला आहे.

Updated: Aug 17, 2017, 03:10 PM IST
‘साहो’साठी प्रभासला मिळाले हवे तितके पैसे, श्रद्धाला मिळाले इतके ? title=

मुंबई : प्रभासच्या आगामी ‘साहो’ सिनेमाची आतापासूनच जोरदार चर्चा रंगली आहे. आतापर्यंत या सिनेमात प्रभासची हिरोईन कोण असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आता त्या सस्पेन्सवरून पडदा उठला आहे.

श्रद्धा कपूर ही या सिनेमात प्रभासची हिरोईन असणार आहे. आता या सिनेमासंबंधीच्या इतर गोष्टींची चर्चाही होतीये. 

श्रद्धा कपूरने या सिनेमासाठी मोठ्या मानधनाची डिमांड केल्याचं समोर येतंय. तर प्रभासने सुद्धा या सिनेमासाठी छप्परफाड मानधन वसूल केल्याचं समजतं. मीडिया रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूरने या सिनेमासाठी १४ कोटींची मागणी केली होती. ‘साहो’ या सिनेमाचे तीन भाषांमध्ये चित्रीकरण होणार असल्याने श्रद्धा दुस-या सिनेमांकडे लक्ष देऊ शकणार नाहीये. त्यामुळे तिने इतक्या मानधनाची मागणी केल्याचे समजते. मात्र, आता श्रद्धाने ९ कोटींमध्ये हा सिनेमा साईन केलाय. 

तेच प्रभासबाबत सांगायचं तर प्रभासने घेतलेल्या मानधनावर तुमचा विश्वास बसणार नाही. ‘बाहुबली’ नंतर प्रभासने आपलं मानधन वाढवलं आहे. ‘साहो’साठी प्रभासने ३० कोटींचे मानधन घेतल्याचे समजते. प्रभासचं हे मानधन ‘बाहुबली २’ पेक्षा जास्त आहे. ‘बाहुबली २’ साठी त्याने २०-२५ कोटी रुपये घेतले होते. ‘बाहुबली’सारखा सुपरडुपर हिट सिनेमा दिल्यानंतर प्रभास आंतरराष्ट्रीय स्तरावरचा स्टार बनला आहे.

‘साहो’एक अॅक्शन थ्रिलर सिनेमा असून तामिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचं शूटिंग हैदराबाद, अबुधाबी आणि परदेशातील इतर लोकशनवर होणार आहे. सुमारे १५० कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या चित्रपटात व्हीएफएक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे.