Box Office : छिछोरेने आतापर्यंत कमावला एवढा गल्ला

पाहा आताची कमाई

Updated: Sep 23, 2019, 02:45 PM IST
Box Office : छिछोरेने आतापर्यंत कमावला एवढा गल्ला

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आणि श्रद्धा कपूरचा 'छिछोरे'हा सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची आवड बनून राहिला आहे. ट्रेड तज्ञांनुसार, रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात अक्षय कुमारचा 'केसरी' आणि हृतिक रोशनचा 'सुपर 30' खूप ट्रेंड होत होता. पण छिछोरेने या दोन्ही सिनेमांना मागे टाकलं आहे. 

20 सप्टेंबर रोजी छिछोरे हा सिनेमा तिसऱ्या आठवड्यात पोहोचला. तिसऱ्या शुक्रवारी सिनेमाने 3.09 करोड रुपये कमावले आहे. तर शनिवारी आणि रविवारी 5.70 करोड आणि 7.14 करोड रुपये कमावले आहे. तिसऱ्या आठवड्यात सिनेमाने 15.3 करोड रुपयांची कमाई केली आहे. 

तीन आठवड्यात छिछोरे चार सिनेमांना मागे टाकत 17 दिवसांत 125.23 करोड रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाने 5 दिवसांतच 50 करोड रुपये, 9 दिवसांत 75 करोड रुपये आणि 12 दिवसांत 100 करोड रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात सिनेमाने 68.83 करोड तर दुसऱ्या आठवड्याच 40.47 करोड रुपयांची कमाई केली आहे.