लहानपणी असे दिसायचे 'सिडनाज'; शाळेतील फोटो व्हायरल

'सिडनाज'च्या लहानपणीचे फोटो पाहून चाहते म्हणाले...

Updated: Sep 15, 2021, 12:44 PM IST
लहानपणी असे दिसायचे 'सिडनाज'; शाळेतील फोटो व्हायरल

मुंबई : टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) निधन झाल्यानंतर त्याचं कुटुंब आणि त्याची गर्लफ्रेन्ड शेहनाज गिल यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे. या दुःखातून ते अद्यापही सावरले नाहीत. 2 सप्टेंबर रोजी सिद्धार्थने वयाच्या 40 व्या वर्षी अखेरचा श्वास घतेला. सिद्धार्थच्या निधनानंतर त्याच्या आणि शेहनाजच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी मित्र परिवार येत आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर चाहत्यांना शेहनाजची चिंता सतावत आहे. शेहनाज आणि सिद्धार्थ यांच्यातील नात्याबद्दल प्रत्येकाला माहिती. दोघे कायम इतरांना कपल गोल्स देत असे. 

सिद्धार्थच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आता 'सिडनाज'च्या लहाणपणीचे फोटो व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा शर्टे घातला आहे. त्याने घातलेल्या शर्टवर स्ट्राईप दिसत आहेत. तर शेहनाजने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. फोटोमध्ये शेहनाज फार सुंदर दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर दोघांच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेन्ट आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. एका चाहत्याने 'सना तर लहानपणापासून क्यूट आहे...' असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने 'माहिती नाही कोणाची नजर लागली....' अशी कमेन्ट केली आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज पूर्णपणे कोलमडली आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर ती सोशल मीडियापासून देखील दूर आहे.