देखण्या यामी गौतमवर का आली चेहरा लपवण्याची वेळ?

तिच्या चेहऱ्याला हे काय झाल? 

Updated: Sep 15, 2021, 12:41 PM IST
देखण्या यामी गौतमवर का आली चेहरा लपवण्याची वेळ?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाणारी आणि याच सौंदर्याच्या बळावर हजारो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री यामी गौतम सध्या बरीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकलेल्या यामीनं सोशल मीडियावर एक विचित्र फोटो शेअर केला आहे. जिथं तिचा चेहरा पूर्णच बदललेला दिसत आहे. तिचं हे रुप पाहून प्रथमत: चाहत्यांना चिंताही वाटली. 

हल्लीच प्रदर्शित झालेल्या 'भूत पोलीस' या चित्रपटासाठी हा सारा घाट. या मल्टीस्टारर चित्रपटाला चाहते आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण, यामध्य यामी मात्र वेगळीच छाप सोडून गेली. 

एका भूताच्याच रुपात यामी या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांच्या भेटीला आली. मानेची दुखापत असतानाही तिनं ही आव्हानात्मक भूमिका निभावून नेली. ज्यानंतर आता तिनं या रुपामागे घेण्यात आलेल्या मेहनतीचा उलगडा केला. 

BTS फोटो आणि व्हिडीओ शेअर करत यामीनं लिहिलं, 'मला भयपट फार आवडतात. ज्यामुळं मी भूत पोलीसमध्ये ही भूमिका साकारली. हे सारंकाही माझ्यासाठी सोपं नव्हतं. तयार होण्यासाठी मला 3 तासांचा कालावधी लागत होता. हा मेकअप उतरवण्यासाठी 45 मिनिटं लागत होती. रोज अनवाणी पायानंच चित्रीकरण होत होतं, तेसुद्धा हिमाचलच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत. माझ्या मानेला दुखापत झाली होती. पण, तरीही मला या गोष्टी करायच्या होत्या. योगाच्या सरावामुळं हे शक्य झालं'. 

योगामध्ये पारंगत होण्याची स्वप्न पाहणाऱ्या यामीच्या स्वप्नांची कोरोनानं राखरांगोळी केली. पण, वेळ मिळेल तेव्हा तेव्हा यामीनं योगसाधनेला प्राधान्य दिलं. हा अनुभव तिच्यासाठी जीवनाला कलाटणी देणारा ठरला.