कोरिओग्राफर रेमो डिसूजाच्या पत्नीचे Shocking बॉडी ट्रांसफॉर्मेशन

नृत्यदिग्दर्शक-दिग्दर्शक रेमो डिसूजा यांनी त्यांची पत्नी लिझेल डिसूजाचे ट्रांसफॉर्मेशनचे फोटो शेअर केले आहेत. 

Updated: Sep 20, 2021, 10:54 AM IST
कोरिओग्राफर रेमो डिसूजाच्या पत्नीचे Shocking बॉडी ट्रांसफॉर्मेशन

मुंबई : नृत्यदिग्दर्शक-दिग्दर्शक रेमो डिसूजा यांनी त्यांची पत्नी लिझेल डिसूजाचे ट्रांसफॉर्मेशनचे फोटो शेअर केले आहेत. लिझेलचे हे ट्रांसफॉर्मेशन सगळ्याचं लक्षवेधून घेत आहे. रेमोने शेअर केलेल्या फोटोत त्याने आपल्या पत्नीचा  after - before  लूक शेअर केला आहे. जो पाहून सगळे आश्चर्यचकित झाले आहेत.

रेमोने आपल्या पत्नीच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाचे कौतुक केले आहे. त्याने लिहिले- 'इथे पोहचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, पण सर्वात मोठी लढाई स्वतःशी आहे आणि मी लिझेल हीला हे युद्ध लढताना आणि अशक्य गोष्टी शक्य करताना पाहिले आहे.'

'मी नेहमी म्हणायचो की ते तुमच्या मनात आहे, तुम्हाला स्वतःला मजबूत बनवावे लागेल आणि लिझ तु ते केले आहे. मला तुझा अभिमान आहे, तू माझ्यापेक्षा बलवान आहेस, तू मला प्रेरणा देतेस. '

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

दोन्ही फोटोंमध्ये लिझेल पूर्णपणे वेगळी दिसत आहे. एकीकडे ती पारंपारिक पोशाखात हेल्दी दिसतेय, तर तिच्या सध्याच्या फोटोमध्ये ती वेस्टन लूकमध्ये दिसत आहे. तिच्या  या जबरदस्त बदलाचे खूप कौतुक होत आहे.