सपनाच्या गाण्यावर क्रिस गेलचा डान्स (व्हिडिओ)

विशेष असे की, या गाण्यातील त्याच्या स्टेप्स सपनाच्या स्टेप्सशी मेळ खातानाही दिसतात.

Updated: Apr 23, 2018, 05:43 PM IST
सपनाच्या गाण्यावर क्रिस गेलचा डान्स (व्हिडिओ) title=

मुंबई : टी-२० क्रिकेटमधला धडाकेबाज फलंदाज म्हणजे क्रिस गेल. आयपीएलच्या मोसमात चौकार, षटकारांच्या माध्यमातून बरसणारा क्रिस गेल केवळ गोलंदाच आणि मैदानातील खेळाडूंनाच नाचवत नाही. तर, तो मैदानाबाहेर स्वत:ही नाचताना दिसतोय. सोमवारी त्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) व्हायरल झाला आहे. ज्यात तो लोकप्रिय गायिका सपना चौधरीच्या गाण्यावर नाचताना दिसतोय.

सपनाच्या स्टेप्सची कॉपी

क्रिसच्या या डान्सचा व्हिडिओ स्वत:सपना चौधरीनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. क्रिस गेल पांढरा सूट आणि पांढरे बूट परिधान करून जबरदस्त ठुमके लावाताना दिसतो आहे. सपनाच्या 'तेरी आंखां का यो काजल, मने करे से कोई घायल' या गाण्यावर क्रिसचा हा अनोखा अंदाज त्याच्या चाहत्यांना खिळवून ठेवतोय. विशेष असे की, या गाण्यातील त्याच्या स्टेप्स सपनाच्या स्टेप्सशी मेळ खातानाही दिसतात.

 

Look what I found on Internet. @chrisgayle333 You are such a good Dancer.

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary) on

सपनानेही केले क्रिसचे कौतुक

स्वत: सपना चौधरीनेही गेलच्या डान्सचे कौतूक केले आहे. हा व्हडिओ इस्टाग्रामवर पोस्ट करताना सपनाने लिहिले आहे, 'बघा इंटरनेटवर मला काय मिळाले. क्रिस गेल तू खरोखरच खूप चांगाला डान्सर आहेस.'