इंटिमेट सीनमध्ये भगवद् गीता दिसताच सिनेरसिकांना हादरा; Oppenheimer वर टीकेची झोड

Oppenheimer Box Office Collection : बहुप्रतिक्षित 'ओपेनहायमर' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानं अनेक सिनेरसिकांनी हा चित्रपट तितक्यात उत्सुकतेनं पाहिला आणि त्याला उत्स्फूर्त अशी दादही दिली. (Oppenheimer Review)  

सायली पाटील | Updated: Jul 24, 2023, 08:36 AM IST
इंटिमेट सीनमध्ये भगवद् गीता दिसताच सिनेरसिकांना हादरा; Oppenheimer वर टीकेची झोड  title=
Christpher Nolans Oppenheimer featuring Intimate scene with copy of Bhagavad Gita sparks chaos in internet

Oppenheimer Box Office Collection : ख्रिस्तोफर नोलान (christopher nolan) याचा चित्रपट म्हटलं की, फक्त परदेशी कलाजगतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर इतरही देशांमध्ये असणाऱ्या त्याच्या चाहत्यांमध्ये कुतूहल आणि उत्सुकतेची लाट पाहायला मिळते. अशा या ख्रिस्तोफर नोलानचा 12 आणि बहुचर्चित असा 'ओपेनहायमर' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. किलियन मर्फी याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटानं प्रदर्शनापूर्वीच इतकी प्रसिद्धी मिळवली की, प्रदर्शनानंतर सिनेरसिकांच्या प्रतिक्रिया पासून नोलानचे चित्रपट न पाहणाऱ्यांचेही पाय चित्रपटगृहांकडे वळले. (christopher nolan Oppenheimer featuring Intimate scene with copy of Bhagavad Gita sparks outrage on internet)

असा हा चित्रपट एकिकडे कमालीची प्रसिद्धी मिळवत असला तरीही दुसरीकडे मात्र तो वादाऱ्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे. नोलानच्या या चित्रपटातील एका Inticamet Scene मध्ये हिंदू घर्मात पवित्र समजली जाणारी भगवद् गीता दिसत असल्यामुळं या चित्रपट अनेकांच्या रोषाचा धनी ठरत आहे. भारतीय प्रेक्षकांसाठी प्रणदृश्यामध्ये गीता दिसणं हा हादराच असल्याचं सोशल मीडियावरील त्यांच्या प्रतिक्रिया पाहता लगेचच कळतंय. 

चित्रपटानं दुखावल्या भावना... 

Oppenheimer इंटिमेट सीनवरून नाराजी व्यक्त करत सोशल मीडियालर अनेकांनीच नाराजीचा सूर आळवत निर्माते आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांना धारेवर धरलं आहे. 'हे एखाद्या बॉलिवलूड चित्रपटातील दृश्य असतं, तर स्क्रीनच पेटवल्या असत्या' असं एका ट्विटर युजरनं लिहिलं. 

तर, कलेला सीमा नसल्या तरीही 'ओपेनहायमर'मधील भगवद् गीतेच्या दृश्यानं कलात्मक स्वातंत्र्याची परिसीमा ओलांडल्याची प्रतिक्रिया एका नेटकऱ्याकडून देण्यात आली. Save Culture Save india foundation च्या उदय महुरकर यांनी या चित्रपटातील दृश्यावर नाराजी व्यक्त करत आपलं मत मांडण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत एक खुलं पत्र लिहिलं. भगवद् गीता दिसणाऱ्या 'त्या' दृश्यानं धार्मिक भावना दुखावल्याचं म्हणत त्यांनी केंद्रीय माहिती, प्रसारण मंत्रालयाकडे यावर कारवाई करण्याची मागणी करण्याचाही सूर आळवला. 

हेसुद्धा वाचा : याला म्हणतात Dedication! दिवसभरात खायचा फक्त 1 बदाम; 'ओपेनहायमर'साठी अभिनेत्याच्या त्यागाची गोष्ट

 

पत्रात नेमकं काय लिहिलं? 

'ओपेनहायमर'मध्ये एक असं दृश्य आहे जो हिंदू धर्मावर असणारा एक आघातच आहे, हे नुकतंच लक्षात आलं. सोशल मीडियावर असणाऱ्या माहितीनुसार चित्रपटातील दृश्यामध्ये पुरुष पात्राशी जवळीक साधत असणातना महिला पात्राकडून त्याच्याकडे गीतेती काही पदांचा उल्लेख करण्यास सांगण्यात येतं जिथं तिच्या एका हातात गीता असल्याचं म्हटलं जात आहे, असं या पत्रात लिहिण्यात आलं. 

याच दृश्याला प्रेरणा नेमकी कुठून मिळाली आणि त्याचा अर्थ तरी काय? असा प्रश्न उपस्थित करत असंख्य हिंदूंच्या भावना इथं दुखावल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. आता मुद्दा असा, की या चित्रपटावर केंद्रीय माहिती, प्रसारण मंत्रालय नेमकी काय कारवाई करणार की सावधगिरी बाळगत निर्माते- दिग्दर्शकच या दृश्याला कात्री मारणार?