चहा- कॉफीसाठी अभिनेत्याकडून आकारले ७८,६५० रुपये

ही किंमत थक्कच करुन जात आहे. 

Updated: Sep 5, 2019, 12:16 PM IST
चहा- कॉफीसाठी अभिनेत्याकडून आकारले ७८,६५० रुपये
चहा- कॉफीसाठी अभिनेत्याकडून आकारले ७८,६५० रुपये

मुंबई : चित्रीकरण, कार्यक्रम, चित्रपट आणि इतर विविध कामांमधून उसंत मिळाल्यावर अनेक सेलिब्रिटींची पावलं ही एखाद्या नव्या ठिकाणाकडे मिळतात. काही काळ कुटुंबासोबत व्यतीत करणाऱ्या या सेलिब्रिटींकडून हल्ली मालदीव, मॉरिशस यांसारख्या ठिकाणांना प्राधान्य देण्यात येत आहे. शिवाय, यात आणखी एका ठिकाणाती भर पडली आहे. ते ठिकाण म्हणजे बाली. 

अभिनेता आणि विनोदवीर किकू शारदाने नुकतीच या ठिकाणाला भट दिली. पण, बाली किकूच्या मनात तेथील निसर्ग सौंदर्यासोबतच आणखी एका कारणामुळे चांगलंच लक्षात राहिलं हे खरं. किकूने शेअर केलेली सोशल मीडिया पोस्ट पाहून हे कळत आहे. कारण, पार दुसऱ्या देशात जाणाऱ्या किकूला एका चहाच्या प्याल्यासाठी हजारोंची किंमत मोजावी लागली आहे. 

साधारण पाच ते दहा रुपयांना किंवा फार फार तर शंभर रुपयांपर्यंत चहा विविध ठिकाणी उपलब्ध असते. मग ते ठिकाण एखादी टपरी असो किंवा हॉटेल. त्यापीकडे चहाची किंमत जाऊन जाऊन किती महागात जाणार? या प्रश्नाचं उत्तर किकूच्या एका ट्विटमधून मिळत आहे. हे उत्तर इतरांनाही थक्कच करुन जात आहे. 

'मी एक कप चहा आणि एक कप कॅपच्युनो ऑर्डर केलं होतं. ज्याचं बिल आलं, ७८, ६५० रुपये', किकूच्या बिलामध्ये लिहिलेला हा आकडा पाहून थक्क होऊ नका. कारण, यात त्यालाच काही वावगं वाटत नाही आहे. कारण, भारतीय चलनाच्या अनुशंगाने ही किंमत आहे फक्त ४०० रुपये. आकड्यांचा हा खेळ आणि चलनांमुळे पडणारा फरक पाहता बिलाची ही रक्कम मात्र अनेकांच्याच भुवया उंचावत आहे, हे मात्र नाकारता येणार नाही.