मोठी बातमी! कॉमेडियन राजू श्रीवास्तव पुन्हा अत्यवस्थ, डॉक्टर म्हणाले, "आता ब्रेन आणि हार्ट..."

राजू श्रीवास्तव यांना 2005 मध्ये 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या स्टँड-अप कॉमेडी शोच्या पहिल्या सत्रात सहभागी झाल्यानंतर ओळख मिळाली.

Updated: Aug 18, 2022, 03:16 PM IST
मोठी बातमी! कॉमेडियन राजू श्रीवास्तव पुन्हा अत्यवस्थ, डॉक्टर म्हणाले, "आता ब्रेन आणि हार्ट..." title=

Raju Srivastav Health: प्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा एकदा अत्यवस्थ झाली आहे. गेल्या आठवड्यात 12 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट करताना ट्रेडमिलवरून हृदयविकाराचा झटका आल्याने पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. गेल्या आठवड्याभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली होती. पण अजूनही ते बेशुद्धावस्थेत आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की, "त्यांच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा नाही. त्यांचं ब्रेन डेड असून हृदय देखील व्यवस्थित काम करत नाही."

राजू श्रीवास्तव यांना 2005 मध्ये 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या स्टँड-अप कॉमेडी शोच्या पहिल्या सत्रात सहभागी झाल्यानंतर ओळख मिळाली. याआधी बुधवारी अभिनेता शेखर सुमन याने राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. "राजूची प्रकृती स्थिर आहे. बेशुद्ध आहे पण स्थिर आहे. त्यांना बरे होण्यासाठी आठवडा लागेल. आपण सर्वांनी प्रार्थना करावी. हर हर महादेव.", असं ट्वीट त्यांनी केलं होतं. 

14 ऑगस्ट रोजी, त्यांचा पुतण्या कुशल श्रीवास्तव यांनी खुलासा केला होता की, राजू श्रीवास्तव एम्सच्या आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत आणि "बरे होत आहेत". त्यांनी जिममध्ये जास्त मेहनत घेतल्याचा दावा देखील फेटळला आहे.