कपिलचा show सोडल्यानंतर Sunil Grover वर आली ही वेळ? Video होतोय व्हायरल

या व्हिडीओमध्ये तो चक्क बाजारात हार विकताना दिसतो आहे. 

Updated: Sep 15, 2022, 06:54 PM IST
कपिलचा show सोडल्यानंतर Sunil Grover वर आली ही वेळ? Video होतोय व्हायरल title=

Sunil Grover Viral Video: कॉमेडियन सुनील ग्रोव्हर (Comedian Sunil Grover) त्याच्या फनी स्टाइलसाठी ओळखला जातो. टीव्ही आणि चित्रपटांमध्ये कॉमेडी करण्यासोबतच तो सोशल मीडियावर फनी व्हिडिओही शेअर करत असतो. त्याचे सोशल मीडियावरही अनेक फोलोवर्स आहेत. मध्यंतरी कपिल शर्माचा शो सोडल्याबाबत सुनील ग्रोव्हर चर्चेत आला होता. 

आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून सुनील आपल्या चाहत्यांना अपडेट ठेवण्यासाठी रोज नवनवीन व्हिडीओज शेअर करत असतो. सुनील ग्रोव्हरने व्हिडिओ (Sunil Grover Video) शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो चक्क बाजारात हार विकताना दिसतो आहे. 

सुनील ग्रोव्हर इन्स्टाग्रामवर अनेक मजेशीर व्हिडिओ शेअर करतो. याच तो रस्त्याच्या कडेला बसलेला दिसतोय. त्यांच्यासमोर अनेक नेकलेस, बांगड्या ठेवलेले दिसत आहेत. काही मोत्यांनी बनवलेले तर काही रुद्राक्षांचे नेकलेसेस आहेत. वेगवेगळ्या डिझाईनचे हे हार अतिशय सुंदर दिसत असून या व्हिडिओमध्ये एक मुलगी त्याच्याकडून हार खरेदी करते आहे. 

हा व्हिडिओ सगळीकडेच व्हायरल होतो आहे. त्यासोबत या व्हिडीओवर टेलिव्हिजन आणि बॉलीवूड सेलिब्रेटींनी कमेंट्सही केल्या आहेत. अर्चना पुरण सिंगपासून (Arachana Puran Singh) प्रोड्यूसर साजिद नाडिदवालापर्यंत (Sajid Nadiawala) अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुनील 'गुत्थी' आणि 'रिंक भाभी' सारख्या प्रसिद्ध आणि अतिशय मजेदार पात्रांमध्ये कपिल शर्माच्या शोमधून दिसला आहे. इंडियाज लाफ्टर चॅम्पियन (India's Laughter Champion) या रिअॅलिटी शोच्या फिनालेमध्ये रिंकू भाभीच्या भूमिकेत सुनील ग्रोवर दिसला होता. या शोमध्येही सुनीलने प्रेक्षकांना खूप हसवले.

लवकरच सुनील ग्रोव्हर, अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता स्टारर 'गुडबाय' (Goodbye) चित्रपटात दिसणार आहेत. यासोबतच तो शाहरुख खानच्या जवान (Shahrukh Khan Movie Jawan) या चित्रपटातही काम करत आहे.