कॉमेडी किंग भाऊ कदम झाला 'सिरियल किलर'?

Bhau Kadam : कॉमेडी किंग भाऊ कदम झाला 'सिरियल किलर'? नेमकं काय झालं चला जाणून घ्या...

दिक्षा पाटील | Updated: Oct 6, 2024, 01:37 PM IST
कॉमेडी किंग भाऊ कदम झाला 'सिरियल किलर'? title=
(Photo Credit : Social Media)

Bhau Kadam : लोकप्रिय कॉमेडी वीर अभिनेता भाऊ कदमला कोणत्याही ओळखीची गरज नाही. भाऊ कदम आणि  विनोद हे समीकरण पक्क आहे. नेहमीच सगळ्यांना खळखळून हसवणारा हाच भाऊ कदम आता शार्प शूटर 'सिरियल  किलर' ठरला आहे. तुम्हालाही हे वाचून धक्का बसला ना... तर त्याचं आहे असं की भाऊ कदम काय खरंच शार्प शूटर 'सिरियल  किलर' झाला नाही तर तो 'सिरियल  किलर'  या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अद्वैत थिएटर्स आणि सिंधु संकल्प एन्टरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत, राहूल भंडारे आणि प्रणय तेली निर्मित आणि केदार देसाई लिखित दिग्दर्शित ‘सिरियल किलर’ हे धमाल नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात  भाऊ कदम यांची मध्यवर्ती भूमिका असून त्यांच्या जोडीला अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा हांडे,तेजस पिंगुळकर या नाटकात धमाल उडवणार आहेत. येत्या शनिवारी म्हणजेच 12 ऑक्टोबरला रंगभूमीवर दाखल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मालिका अभिनेत्री आणि रिपोर्टर यांच्यामध्ये घडलेल्या घटनेने संशयाचे सुरुंग पेरले जातात. या घटनेनंतर 'सिरियल  किलर' म्हणून आलेला खरंच 'सिरियल  किलर' असतो की नसतो? याचा धमाल खेळ रंगतो आणि तो किती गमतीशीर असणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. फुल टू कॉमेडीच्या रॅपरमध्ये  गुंडाळून आलेला 'सिरियल किलर' काय धमाल उडवतो हे पाहणं रंजक ठरणार आहे. 

हेही वाचा : आध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्यनं सलमानला भेट दिली भगवत गीता; भाईजाननं काय केलं पाहा...

‘बेभान कॉमेडी आणि निखळ आनंदासोबतच आमच्या सगळ्यांच्या भन्नाट ट्यूनिंगची ट्रीट देणारं 'सिरियल किलर’ हे नाटक  प्रेक्षकांना निखळ आनंद  देईल’  असा विश्वास अभिनेते भाऊ कदम यांनी व्यक्त केला आहे. ‘नाट्यरसिकांना नेहमी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न अद्वैत थिएटर्सने  केला आहे. ‘सिरियल किलर’ च्या माध्यमातूनही आम्ही सस्पेंस धमाल अशी नाट्यकृती आणली असून भाऊ कदमच्या चाहत्यांसाठी हे नाटक मनोरंजनाची दिलखुलास पर्वणी असणार आहे’. नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे आहे तर संगीत विजय गवंडे यांचे आहे. प्रकाशयोजना श्याम चव्हाण यांची आहे. सूत्रधार सुनील पानकर  गोट्या सावंत आहेत.