बॉलिवूड गायिका कनिका कपूर ठणठणीत, डिस्चार्जनंतर होम क्वारंटाईन

कोरोनाचा फैलाव होत असताना एक दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. बॉलिवूड गायिका कनिका कपूर कोरोना मुक्त झाली आहे. 

Updated: Apr 10, 2020, 10:53 AM IST
बॉलिवूड गायिका कनिका कपूर ठणठणीत, डिस्चार्जनंतर होम क्वारंटाईन title=
छाया - कनिका कपूर इन्स्टाग्राम

मुंबई : कोरोनाचा फैलाव होत असताना एक दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. बॉलिवूड गायिका कनिका कपूर कोरोना मुक्त झाली आहे. तिची सहावी चाचणी निगेटिव्ह आली आहे. पहिल्या पाच चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या होत्या. मात्र, त्यानंतरची चाचण्या निगेटिव्ह आल्याने कनिका कपूरच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कनिका कपूरची उत्तर प्रदेश पोलिसांकडून चौकशी होणार आहे. तसेच कनिकाला घरी सोडल्यानंतर तिला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

 कनिका परदेस दौऱ्यावरुन भारतात आली होती. तिला कोरोना झाल्याची माहिती तिने लपवून ठेवली होती. त्यानंतर तिने तीन पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला बॉलिवूड स्टार, क्रिकेट पट्टू, राजकीय नेतेही उपस्थित होते. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला होता. दरम्यान, अनेकांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. तर माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे तसेच त्यांचा मुलगा खासदार दुष्यंत सिंह हेही कनिका कपूरच्या पार्टीत सहभागी झाले होते. त्यानंतर ते संसदेत अधिवेशनाला उपस्थित राहिले होते. त्यानंतर संसद परिसरात पूर्णत: निर्जंतुक फवारणी  करण्यात आली होती. तसेच योग्य ती खबरदारी घेतली. जे खासदार दुष्यंत यांच्या संपर्कात आले त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले होते. खासदार दुष्यंत यांची चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे त्यांचा धोका टळला.

कनिकाचा सहावा रिपोर्ट निगेटिव्ह आला. आता तिला लखनऊच्या रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ती आता घरी आहे आणि ठीक आहे. तिच्या भावाने, स्पॉटबॉयईला दिलेल्या मुलाखतीत अनुरागने ही माहिती दिली. याला दुजोरा देताना तो म्हणाला, "हो, कनिका परत आली आहे. आम्ही सर्वजण आनंदी आहोत. तिच्यात चांगली सुधारणा झाली आहे." कानिकाला कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आलेला नाही आणि तिच्यामुळे कोणालाही संसर्ग झाला नाही याचा त्यांना आनंद झाला आहे.

अनुरागने पुढे सांगितले की, कनिकाची प्रकृती चांगली झाल्याने आम्हाला आनंद झाला आहे. कुटुंबातील प्रत्येकासाठी हा एक मोठा दिलासा आहे. आम्ही अत्यंत चिंताग्रस्त होतो. तिच्या सुरक्षिततेबद्दल देवाचे आभार मानतो. कनिकाची २० मार्च रोजी कोरोनाची चाचणी घेण्यात आली. तिच्यावर संजय गांधी पदव्युत्तर वैद्यकीय विज्ञान संस्था (एसजीपीजीआयएमएस), लखनऊ येथे उपचार सुरु होते. तिच्या सलग पाच चाचणी अहवालात तिला कोरोनाव्हायरस-पॉझिटिव्ह म्हणून दाखविण्यात आले आणि सहावा नकारात्मक झाला. दोन आठवडे निरीक्षणाखाली राहिल्यानंतर कनिकाला रुग्णालयातून सोडण्यात आले.