दीपिका पदुकोणने रणवीरला अशा अवस्थेत केलं कैद

कुटुंबासोबत वेळ घालवण्यात कलाकार व्यस्त 

Updated: Apr 3, 2020, 10:25 AM IST
दीपिका पदुकोणने रणवीरला अशा अवस्थेत केलं कैद

मुंबई : COVID-19 मुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अशावेळी बॉलिवूड कलाकार देखील आपल्या कुटुंबियांसोबत घरात राहून त्यांच्यासोबत वेळ घालवत आहेत. मात्र अशावेळी अभिनेत्री दीपिका पदुकोणचा खोडकर अंदाज समोर आला आहे. दीपिकाने आपल्या आणि रणवीर सिंहच्या चाहत्यांना तणावाच्या वातावरणातून थोडं रिलॅक्स करण्यासाठी अनोखा अंदाज शोधून काढला आहे. 

दीपिकाने रणवीर सिंहचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटोपाहून चाहत्यांना हसू आवरणार नाही. एका मजेदार कॅप्शनसोबत तिने हा फोटो शेअर केला आहे. 

लॉकडाऊनची सिरीज करत गेल्या कित्येक दिवसांपासून दीपिका इंस्टाग्रामवर चर्चेत आहे. आताच्या पोस्टमध्ये तिने रणवीरचा झोपलेला फोटो शेअर केला. त्या फोटोवर Husband असा टॅग लावू शेअर केला आहे. या फोटोत रणवीर अतिशय गाढ झोपला आहे. त्याच्या कपाळावर Husband हा टॅग आहे. तसेच यामध्ये दीपिकाने 'सिझन १ : एपिसोड ७... आणि जेव्हा मी त्याच्यासोबत होती' असं म्हणतं #COVID-19 #wannabemariekondo #thinkitookittoofar असे टॅग वापरले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Season 1:Episode 6 You know...In case it wasn’t clear enough.#wannabemariekondo Productivity in the time of COVID-19!

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

लॉकडाऊनमुळे सध्या सगळेच घरी आहेत. कलाकार देखील आपलं शुटिंग बंद करून घरीच आहेत. कोरोनामुळे त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवण्याची एक चांगलीच संधी मिळाली आहे. या संधीचा लाभ घेताना प्रत्येक कलाकार दिसत आहे.