अक्षय कुमारने बुक केलं मुंबई-दिल्लीचं संपूर्ण विमान

...म्हणून अक्षय कुमारने बुक केलं संपूर्ण विमान

Updated: May 31, 2020, 02:32 PM IST
अक्षय कुमारने बुक केलं मुंबई-दिल्लीचं संपूर्ण  विमान
फोटो सौजन्य : Twitter

मुंबई : देशात लॉकडाऊनमुळे अनेक लोक आपल्या कुटुंबियांपासून लांब अडकले आहेत. अशा कठिण परिस्थितीत प्रत्येक जण आपल्या कुटुंबियांकडे पोहचण्यासाठी धडपडतो आहे. गरजुंच्या मदतीसाठी अनेक सेलिब्रिटीही पुढे सरसावले आहे. अशातच अक्षय कुमारने त्याची बहीण अलका भाटिया आणि तिच्या मुलांना मुंबईतून दिल्लीला पाठवण्यासाठी संपूर्ण विमानचं बुक केलं आहे. सोशल मीडियावर त्याच्या या अंदाजाने अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.

कोरोनाचा धोका लक्षात घेता, अक्षयने संपूर्ण विमान बुक केलं आहे. मुंबई ते दिल्ली अशा बुक केलेल्या विमानातून केवळ चार लोकांनी प्रवास केला. यात अलका भाटिया, तिची दोन मुलं आणि एक मदनीस अशा चार जणांनी प्रवास केला.

अक्षयच्या बहिणीला प्रवासादरम्यान कोणतीही विशेष सुविधा देण्यात आली नाही. यावेळी सरकारकडून सांगण्यात आलेल्या सर्व नियम आणि उपायाचं पालन करण्यात आलं. अक्षयप्रमाणेच याआधी एका व्यवसायिकानेही केवळ चार जणांसाठी संपूर्ण विमान बुक केलं होतं. व्यवसायिकाची मुलगी, तिची मुलं आणि मदतनीस हे भोपाळ ते दिल्लीसाठी असणाऱ्या या विमानातून आपल्या घरी पोहचले होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Even in this day and age, you’re the only one whose one hand on my head can comfort me in troubled times because I know there’s nothing I can’t do with your blessings maa. Happy #MothersDay 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

दरम्यान, अक्षय कुमार नेहमीच अनेकांच्या मदतीसाठी पुढे येतो. कोरोना विरोधात लढाईसाठीही अक्षयने योगदान दिलं आहे. अक्षयने पीएम केअर्स फंडमध्ये 25 कोटी, बीएमसीसाठी 3 कोटी आणि CINTAA या संस्थेला 45 लाखांची मदत केली आहे.