शाहरुखसोबत ब्रावोचा 'लुंगी डान्स' पाहाच...

शाहरुख-ब्रावोचा लुंगी डान्स व्हायरल

Updated: Sep 11, 2019, 09:23 AM IST
शाहरुखसोबत ब्रावोचा 'लुंगी डान्स' पाहाच... title=

नवी दिल्ली : वेस्टइंडीजमध्ये सध्या सीपीएल (CPL) म्हणजेच कॅरेबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League) सुरु आहे. या   कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये शाहरुख खानची टीम त्रिनबागो नाईट रायडर्स जबरदस्त परफॉर्म करतेय. त्यांनी सुरुवातीच्या तीनही मॅच जिंकल्या. शाहरुखने संघाचा हा तिसरा विजय खेळाडूंसह 'लुंगी डान्स' करत साजरा केलाय. 

कीरोन पोलार्डच्या कॅप्टन्सीमध्ये शाहरुखचा त्रिनबागो नाईट रायडर्स संघ तीन सामने जिंकून दुसऱ्या स्थानी आहे. संघाच्या तिसऱ्या सामन्याच्या विजयानंतर एका खासगी बोटवर पार्टी ठेवण्यात आली होती. या संघाचा मालक शाहरुखसह सर्व खेळाडू सामिल झाले होते. 

 
 
 
 

A post shared by Dwayne Bravo (@djbravo47) on

यावेळी टीकेआर (TKR)संघाच्या ड्वेन ब्रावोने (Dwayne Bravo) इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ब्रावो शाहरुखसोबत त्याच्या 'चेन्नई एक्सप्रेस' चित्रपटातील लुंगी डान्स गाण्यावर थिरकताना दिसतोय. या पार्टीतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. 

ब्रावोच्या बोटाला ईजा झाल्याने तो या स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

४ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या सीपीएलच्या ७व्या सीजनमध्ये तीन सामने जिंकत टीकेआर दुसऱ्या स्थानी आहे.