चेन्नई : हिंदी कलाविश्वात एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये काही नावं घ्यायची झाल्यास त्यामध्ये एक नाव आवर्जून घेतलं जातं. हे नाव म्हणजे अभिनेत्री वैजयंतीमाला यांचं. पारंपरिक लूकपासून स्वीमसूट आणि बिकीनी लूकपर्यंत प्रत्येक रुपात रुपेरी पडदा गाजवणाऱ्या वैजयंतीमाला या अनेकांच्या आवडत्या अभिनेत्री.
सध्याच्या घडीला वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या या अभिनेत्रीने पुन्हा एकदा अनेकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. यावेळी निमित्त ठरत आहे ते म्हणजे वैजयंतीमाला यांनी सादर केलेलं भरनाट्यम नृत्य. चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान, त्यांनी ८३व्या वर्षी अशी काही किमया केली, की पुन्हा एकदा या सहाबहार अभिनेत्रीने उपस्थितांची मनं जिंकली.
प्रशिक्षित भरतनाट्यम नर्तकी असणाऱ्या वैजयंतीमाला यांनी यावेळी ज्या अदाकारीने त्यांची कला सादर केली ते पाहता 'क्या बात....' अशीच उत्फूर्त प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली. यावेळी त्यांनी सादर केलेल्या नृत्यामध्ये वैजयंतीमाला यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, त्यांच्या नृत्य मुद्रांमधील बारकावे या सर्व गोष्टी त्या सादरीकरणाला आणखी उठावदार करुन गेले.
Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच
She is 83 years old. She is the famous actress, Vyjayanthimala. At this age most of the ladies can't walk properly - but she is performing #Bharatnatyam in #Chennai for a charity show. Just unimaginable! Proves that age for some is just a number! #MustWatch #Dance pic.twitter.com/SwipN0IG1p
— Ananth Rupanagudi (@rananth) December 26, 2019
सोशल मीडियावर वैजयंतीमाला यांच्या या नृत्याची बरीच चर्चा झाली. उतारवयातही कलेप्रती असणारी त्यांती समर्पकता आणि आत्मियता इतरांना प्रेरणा देणारी ठरली. तर बऱ्याच अंशी वैजयंतीमाला यांचा उत्साह अवाक करुन गेला. कलाविश्वात सध्याच्या घडीला त्या सक्रिय नसल्या तरीही विविध कार्यक्रमांना मात्र त्यांची उपस्थिती पाहायला मिळते.