आमिरच्या लेकिची कमाल; सर्वात महागडी कार खरेदी केल्यामुळं सगळेच अवाक्

बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये 'या' कारची खूप मागणी आहे. आता एका अभिनेत्रीनेही ही सर्वात महागडी कार खरेदी केलीय.

Updated: May 19, 2022, 12:16 PM IST
आमिरच्या लेकिची कमाल; सर्वात महागडी कार खरेदी केल्यामुळं सगळेच अवाक् title=

मुंबईः बॉलिवूड कलाकार त्यांच्या फॅशनसोबतच त्यांच्या लक्झरी लाईफमुळेही नेहमी चर्चेत असतात. महागड्या कपड्यांसोबतच महागड्या कारही अनेक कलाकारांना आवडतात. BMW, AUDI, Mercedes सारख्या कारला कलाकारांची पसंती असते. आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीने एक महागडी कार खरेदी केली आहे.

Audi ची लक्झरी Q8 SUV भारतात खूप पसंत केली जात आहे, विशेषत: बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये या कारची खूप मागणी आहे. अलीकडे, रॅपर बादशाहने ही SUV त्याच्या गॅरेजचा एक भाग बनवली आणि आता दंगल चित्रपटाची अभिनेत्री सान्या मल्होत्राने नवीन ऑडी Q8 विकत घेतली आहे.

सान्याने या एसयूव्हीचा मिथॉस ब्लॅक मेटॅलिक कलर खरेदी केला आहे. ही कार दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे - Q8 सेलिब्रेशन आणि Q8 स्टँडर्डची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 1.03 कोटी आणि 1.38 कोटी रुपये आहे. आरामदायी सीट आणि शक्तिशाली इंजिन यामुळे ऑडी Q8 भारतात तसेच जगभरात खूप पसंत केली जाते.

ऑडीची Q8 SUV केवळ दिसायलाच सुंदर नाही, तर लक्झरी कारमध्ये असायला हवी अशा सर्व वैशिष्ट्यांसह तिच्यात आहेत. एसयूव्हीला हवेशीर मसाज सीट, 4-झोन क्लायमेट कंट्रोल आणि केबिनमध्ये सुगंध आणि आयनाइझर मिळते.