'तारे जमीन पर' मधील चिमुकल्याचा फोटो पाहून चाहते म्हणतायेत ये वही ईशान है?

 सध्या एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

Updated: Nov 7, 2021, 08:56 PM IST
'तारे जमीन पर' मधील चिमुकल्याचा फोटो पाहून चाहते म्हणतायेत ये वही ईशान है? title=

मुंबई : आमिर खानचा 'तारे जमीन पर' हा लोकप्रिय चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. या चित्रपटात दर्शील सफारी इशानच्या भूमिकेत दिसला होता. 2007 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या दर्शील सफारीने त्याच्या अभिनयासाठी बरीच प्रशंसा मिळवली. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन 14 वर्षे झाली आहेत आणि या वर्षांत दर्शील मोठा झाला आहे. २४ वर्षीय दर्शीलचा यावेळी सोशल मीडियावर एक फोटो समोर आला आहे, जो पाहून लोकांना विश्वास बसत नाही की, हा तोच छोटा ईशान आहे. ज्याला चित्रपटात वाचन आणि लिहिण्यात समस्या होती.

दर्शील सफारीने लहान वयात राष्ट्रीय पुरस्कार पटकावून सर्वांना आश्चर्यचकित केलं. व्हायरल होत असलेल्या दर्शीलच्या फोटोमध्ये तो काळ्या रंगाचा चष्मा आणि पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. हे फोटो पाहून लोक त्याला ओळखू शकत नाहीत. मात्र, असं काही आहे ज्यांनी दर्शीलला ओळखलं आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यावर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिलं आहे की, 'तुम्हाला पाहून अजूनही असंच वाटतं की, तुम्ही तारे जमिनी के मध्ये जेवढे जिनीयस होता तितकेच प्रतिभावान आहात'. तर दुसऱ्याने लिहिलं की, 'तुला पाहून ओळखू शकलो नाही'. त्याचवेळी, एकाने त्याचं वर्णन मनी हाईस्ट प्रोफेसर आणि निक जोनास यांचं मिश्रण करुन केलं आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x