बापरे ही अशी दिसते? 5 वर्षांनंतर पती आणि मुलासोबत दिसली 'दयाबेन', तिला ओळखणंही कठीण

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली दिशा वकानी नुकतीच एका कार्यक्रमात दिसली. तब्बल सहा वर्षांनी ती सार्वजनिक ठिकाणी दिसली. 

Updated: Oct 17, 2023, 11:22 AM IST
बापरे ही अशी दिसते? 5 वर्षांनंतर पती आणि मुलासोबत दिसली 'दयाबेन', तिला ओळखणंही कठीण

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही सर्वात लोकप्रिय मालिका म्हणायला हरकत नाही. कुटुंबीय आणि लहान्यापासून मोठ्यापर्यंत या मालिकेने वेड लावलं आहे. या मालिकेतील गाजलेलं पात्र म्हणजे दयाबेन...दयाबेन म्हणजे अभिनेत्री  दिशा वकानी (Disha Vakani) हिनेदेखील या मालिकेला काही वर्षांपुर्वी राम राम केला आहे. पण तरीदेखील आजही तिची क्रेज काही प्रेक्षकांमध्ये कमी झाली नाहीये. 

Add Zee News as a Preferred Source

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली दिशा वकानी नुकतीच एका कार्यक्रमात दिसली. तब्बल सहा वर्षांनी ती सार्वजनिक ठिकाणी दिसली. यावेळी पती आणि मुलगाही तिच्यासोबत होते. दिशा वकानी लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती. ती नवरात्रीच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती. मात्र तिला पाहिल्यानंतर तिला ओळखणंही कठिण असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.

दिशा वाकानी 16 ऑक्टोबर रोजी पती मयूर पडिया आणि मुलासोबत नवरात्री सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती. दिशा वकानीने गुलाबी आणि सोनेरी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता, तर तिच्या पतीने गुलाबी रंगाची शेरवानी घातली होती आणि त्यांनी त्यांच्या मुलाला आपल्या उचलून घेतलं होतं. लग्नानंतर पहिल्यांदाच दिशा वाकानी तिच्या पतीसोबत पापाराझींसमोर आली होती.

2017 पासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कार्यक्रमातून दिशा वकानी अभिनयापासून दूर असल्याची माहिती आहे. 2017 मध्ये, तिने तिच्या मुलीच्या जन्मानंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सोडला. काही काळानंतर, दिशा वाकानी शोमध्ये परतणार असल्याच्या बातम्या आल्या, मात्र काही कारणांमुळे हे प्रकरण हे अफवाच राहिलं. यानंतर मे 2022 मध्ये दिशा वाकानीने मुलाला जन्म दिला. तेव्हापासून दिशा वाकानी तिच्या कौटुंबिक जीवनात व्यस्त आहे. ती ना अभिनयाच्या दुनियेत परतली ना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिशा वाकानी परतणार 'तारक मेहता'मध्ये!
दिशा वाकानीला शोमध्ये परत आणण्यासाठी असित मोदीने अनेकदा प्रयत्न केले असले तरी काही गोष्टींवर परिणाम होऊ शकला नाही. तसं, असित मोदींनी एका मुलाखतीत निश्चितपणे सांगितलं होतं की, दयाबेन लवकरच 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून परतणार आहे. याशिवाय, असित मोदीने दिशा वाकानीच्या शोमधील योगदानाचंही कौतुक केलं. मात्र दयाबेन शोमध्ये परत कधी येणार, दिशा वाकानी येणार की आणखी कोणी याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही.

About the Author