VIDEO: काजोलला पाहताच 'तो' धाडकन पडला; नेटकरी म्हणाले, 'हा तर नवा गडी...'

Photographer Fell Down Kajol Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्याची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी हा व्हिडीओ पाहून कदाचित तुम्हीही फार हसू लागाल. यावेळी काजोलचा फोटो काढायच्या नादात हा फोटोग्राफर घसरून पडला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 17, 2023, 11:19 AM IST
VIDEO: काजोलला पाहताच 'तो' धाडकन पडला; नेटकरी म्हणाले, 'हा तर नवा गडी...' title=
viral video photographer fell down while clicking kajol at airport (Photo: Viral Bhayni | Instagram)

Kajol Fan Viral Video: सेलिब्रेटी कुठेही स्पॉट झाले की त्यांच्या मागे मागे येत चाहते त्याच्यासोबतच सेल्फी काढण्यासाठी फार उत्सुक असतात. त्यांच्यामागे सतत फिरत असणारे हे चाहते हे इतके उत्सुक असतात की काही विचारू नका त्यातून आपल्या आवडत्या कलाकाराचा फोटो घेण्यासाठी हे चाहते धडपडतात, पडतात, मारही खातात. त्यामुळे अशावेळी त्यांचे फोटो काढणारेही तीक्ष्ण नजर असणारेही आजूबाजूला असतात. सध्या अशाच एका वेड्या चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी अभिनेत्री काजोलसोबत फोटो काढण्यासाठी आतूर झालेला हा चाहता पाय घसरून पडतो आणि त्यात त्याचा फोनही पडतो. तेव्हा त्याची एवढी फजिती होते की काही विचारू नका. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेण्डमध्ये आला आहे. त्याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी त्याला पडताना पाहून काजोलही हसू लागते आणि त्याची मदत करते, त्याला त्याचा फोन परत देते आणि पुढे चालू लागते. 

काही मिनिटांपुर्वी उत्सुक असलेला हा चाहता पुढच्या काही सेकंदातच अपसेट होऊन जातो. सध्या त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फॅन इतक्या जोरात घसरून पडतो की त्याला त्याचंच कळत नाही की तो कसा पडला ते. यावरून हे लक्षात येईल की चाहते की ही आतूर असतात ते. या व्हिडीओत तर या चाहत्यांची अति तिथं मातीच झाली आहे. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी नानाविध कमेंट्स केल्या आहेत. यावेळी काजोल एअरपोर्टवर स्पॉट झालेली दिसते आहे.

हेही वाचा : हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त अवरतलं अख्खं बॉलिवूड पण सनी-बॉबी देओल कुठे? 

एअरपोर्टवरून चालत असताना मध्येच एक माणून येतो तिचा फोटो काढण्यासाठी आणि तेवढ्यातच जमिनीच्या टाईल्सवरून घसरून पडतो. हा पापाराझी असावा अथवा काजोलचा फॅन असावा. त्याचा पाय घसरलेला पाहूनच काजोलही थांबते आणि सर्वच त्याला मदत करायला येतात. त्याचा पडलेला फोनही काजोल त्याला परत करते. तिची ही माणुसकी पाहूनही अनेक लोकं तिची स्तुती करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ @viralbhayani या पापाराझी पेजनं पोस्ट केला आहे. इन्स्टाग्रामवर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'हा नवा गडी आहे!' 

पाहा व्हिडीओ : 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याआधी काजोलही अनेकदा धडपडताना दिसते. त्यामुळे तिचीही काहींनी खिल्ली उडवली आहे. एका युझरनं लिहिलंय की, ''आधी काजोल पडायची, आता तिचे फोटो काढणारे तिचे फॅन्स पडताएत'. तर काहींच्या मते, हा फक्त एक ड्रामा आहे. एका युझरनं लिहिलंय की, ''हे सर्व काही स्क्रिप्टेड आहे.'' त्यामुळे सध्या या व्हिडीओची जोरात चर्चा आहे हे नक्की!