'तारक मेहता..' मध्ये या कॅरेक्टरची घरवापसी, येणार नवा ट्विस्ट

दिशा आई बनल्यानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप व्यस्त आहे.

Updated: Mar 29, 2018, 02:22 PM IST
'तारक मेहता..' मध्ये या कॅरेक्टरची घरवापसी, येणार नवा ट्विस्ट

मुंबई : सब टीव्हीचा सर्वात लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील महत्त्वाची भुमिका करणारी अभिनेत्री दिशा वकानी सध्या शो सोडण्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. या बातमीमुळे तिचे फॅन्स खूपच दु:खी होते. रिपोर्टनुसार, दिशा आई बनल्यानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप व्यस्त आहे. तिच्या बाळासाठी तिला वेळ द्यायचाय. तिची मुलगी लहान आहे. तिच्या देखभालीसाठी तिला घरी थांबायचय. अशा अनेक कारणांमुळे तिची शो मध्ये घरवापसी सध्या कठीण वाटत आहे. असं असल तरी शो सोडण्यावरून दिशाकडून कोणती बाजू ऐकायला मिळाली नाही. त्यामुळे दिशाने शो सोडलाय अस सध्या तरी म्हणता येत नाही.

जुन्या आठवणींना उजाळा 

'आजतक'ने दिलेल्या वृत्तानुसार दिशा शोमध्ये पुन्हा येण्यास तयार आहे. शोचे निर्माते शोचा नवा ट्रॅक आणणार आहेत.

दया आणि जेठालाल आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतील. आपल लहानपण आणि तेव्हाच्या आठवणी काढताना ते दिसतील.

दिशावर दिसणार असलेल्या सिक्वेलची शूटींग पूर्ण झाली आहे. ज्याचे फुटेज येणार्या भागात निर्मात्यांकडून दाखविली जाईल.

फॅन्ससाठी धक्का 

 

My mood today be like this

A post shared by Disha Vakani (@disha.vakani) on

दिशाने गेल्या वर्षात सप्टेंबरमध्ये शेवटच शूट केलं होतं. जर दिशा सोडून गेली तर तिच्या फॅन्ससाठी हा खूप मोठा धक्का असेल.

कारण तिच्या बोलण्याची, हसण्याची एक वेगळी लकब आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये दयाबेनचा मुलगा टप्पूची भूमिका करणाऱ्या भव्य गांधीने काही दिवसांपूर्वीच शो सोडलाय. त्याला गुजराती सिनेमात काम मिळाल आहे.