सुव्रतच्या या व्हिडिओने केली नेटीझन्सची 'शिकार'

'दिल दोस्ती दुनियादारी’ या गाजलेल्या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेला.  आणि त्यानंतर ‘अमर फोटो स्टूडीओ’च्या माध्यमातून आपल्या अभिनयाची वेगवेगळी बाजू मांडणारा सुव्रत जोशी. आता हाच शांत, संयमी तर कॉमेडी भूमिका साकारणार सुव्रत हा महेश मांजरेकर यांचे सादरीकरण असलेल्या आणि विजू माने दिग्दर्शित ‘शिकारी’ या बहुचर्चित मराठी चित्रपटातून पदार्पण करणार आहे. शिकारी या चित्रपटात तो महत्वाच्या भूमिकेत झळकत आहे.

Dakshata Thasale Updated: Mar 29, 2018, 02:17 PM IST
सुव्रतच्या या व्हिडिओने केली नेटीझन्सची 'शिकार'

मुंबई : 'दिल दोस्ती दुनियादारी’ या गाजलेल्या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेला.  आणि त्यानंतर ‘अमर फोटो स्टूडीओ’च्या माध्यमातून आपल्या अभिनयाची वेगवेगळी बाजू मांडणारा सुव्रत जोशी. आता हाच शांत, संयमी तर कॉमेडी भूमिका साकारणार सुव्रत हा महेश मांजरेकर यांचे सादरीकरण असलेल्या आणि विजू माने दिग्दर्शित ‘शिकारी’ या बहुचर्चित मराठी चित्रपटातून पदार्पण करणार आहे. शिकारी या चित्रपटात तो महत्वाच्या भूमिकेत झळकत आहे.

शिकारी या चित्रपटाची बोल्ड पोस्टर्स आणि साँग लाँच झाले आहेत. आणि या चित्रपटाची चर्चा सुरु झाली. ‘अ लाफ रायट, अ सेक्स कॉमेडी विथ अ मेसेज’ असे ब्रीदवाक्य घेऊन ही पोस्टर्स झळकली आहेत. नेहा खान हिची मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात आहे, तर तेवढीच महत्वाची भूमिका सुव्रतने साकारली आहे. त्याच्यासोबत कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, भाऊ कदम, वैभव मांगले, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाबद्दल मराठी चित्रपट रसिकांमध्ये सध्या फार उत्सुकता लागून राहिली आहे.

सुरूवातीला सुव्रचा इतका बोल्ड अंदाज प्रेक्षकांना धक्का देणारा होता. मात्र अभिनयाची वेगळी बाजू म्हणून सुव्रत याकडे पाहतो आहे. तर त्याच्या चाहत्यांनी देखील ही गोष्ट मान्य केली आहे. आणि आता सगळेजण सुव्रतचा हा हटके अंदाज पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. या सिनेमाचं एक गाण लाँच झालं आहे.