मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही शोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. दयाबेन लवकरच शोमध्ये परत येऊ शकते. लवकरच दयाबेन टीव्हीवर गरबा करताना तिच्या चाहत्यांन दिसणार आहे. मात्र यासाठी शोच्या निर्मात्यांना दयाबेन म्हणजेच दिशा वाकाणीच्या काही अटी मान्य कराव्या लागणार आहेत.
पुन्हा येऊ शकते दयाबेन
दयाबेन म्हणजेच दिशा वकानी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये बऱ्याच दिवसांपासून दिसलेली नाही. ती प्रेग्नंसी रजेवर गेली पण ती शोमध्ये परतलीच नाही. दरम्यान, दिशा आता पुन्हा मालिकेत परतत असल्याचं अनेकदा ऐकायला मिळत होतं. पण चाहत्यांची निराशा झाली. दिशा वाकाणीचा पती मयूर यानेही अधिकृत निवेदन जारी करून सांगितलं की, त्याची पत्नी शोमध्ये परतणार नाही. पण आता दिशा शोमध्ये परतण्याची शक्यता आहे.
दिशा वकानीच्या अटी
बातमीनुसार, जर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या निर्मात्यांनी दया बेनची फी म्हणजेच पर एपिसोड 1.5 लाख एवढी वाढवली. आणि जर तिला दिवसाला फक्त 3 तास काम करण्याची अट मान्य केली. तर ती कामावर परत येईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिशाचा पती मयूर शोच्या मेकर्सशी बोलणी करत आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या सेटवर आपल्या मुलीसाठी वैयक्तिक पाळणाघरही बनवावं, अशी दिशा आणि तिच्या पतीची इच्छा असल्याचं बोललं जात आहे. आणि एक केअरटेकरदेखील तिथे नेहमी त्या मुलीसोबत असावी.
या मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी आता या शोचा भाग नसली तरी चाहत्यांना तिची आठवण येत असते. दिशा वकानी गेल्या अनेक वर्षांपासून या शोमध्ये दिसलेली नाही आणि निर्मात्यांनी तिची भूमिका कोणाचीही बदली केलेली नाही. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' दिशा वाकाणीच्या अभिनय कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला आहे.