मुंबई : अनुराग कश्यप Anurag Kashyap सध्या आपल्या ट्वीटरवॉरमुळे जोरदार चर्चेत आहे. CAA विरोधात अनुराग कश्यपकडून ट्विटरवरून सध्या भाजपवर BJP टीका केली जात आहे. अशातच भारतीय जनता पक्षाने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (CAA) ला सपोर्ट करण्यासाठी एक टोल फ्री नंबर दिला आहे. यालाच टार्गेट करत अनुराग कश्यपने ट्विट केलं आहे.
अनुराग म्हणतो की,'क्या बात है अमित शाह साहेब. एकच नंबर दोघांकडे. अमित मालविया आणि भाजपचा हा साइड बिझनेस आहे का? की लोकांना बनवलं जातं आहे, जे तुम्ही आतापर्यंत करत आलात तसं'.
क्या बात है @AmitShah साहब । एक ही नम्बर दोनो के पास। साइड बिज़्नेस है ये आपका, @amitmalviya और @BJP4India का या फिर लोगों को बनाया जा रहा है जो आप लोग करते आए हो । pic.twitter.com/7LHIYgHAqW
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) January 4, 2020
भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विटरवरून 8866288662 या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल देऊन तुमचा पाठिंबा द्या असं आवाहान केलं होतं. मात्र हा क्रमांक शेअर करत एकाने मोफत सेक्ससेवा मिळणार असल्यांची पोस्ट ट्विट केली आहे. या दोन्हीचे स्क्रीनशॉर्ट शेअर करत अनुरागने भाजपवर टीका केली आहे. हा एकच क्रमांक दोघांकडे आहे. म्हणजे हा तुमचा जोडधंदा आहे का? असं म्हणतं तुम्ही नेहमीप्रमाणे लोकांना मुर्ख बनवत आहात का? असा सवाल विचारला जात आहे.
CAA कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. देशभरातून अनेक ठिकाणी या विरोधात आणि या कायद्याच्या समर्थनार्थ रॅली निघत आहे. याच पार्श्वभूमीवर या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर फोन करून मिस कॉल देण्याची मोहिम भाजपने सुरू केली होती.