पतीने अपघातात गमावले डोळे, अभिनेत्रीनं केलं मुंडन

 अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत.

Updated: Oct 21, 2021, 01:03 PM IST
पतीने अपघातात गमावले डोळे, अभिनेत्रीनं केलं मुंडन

मुंबई : अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. लग्नाच्या अनेक वर्षानंतरही दोघांचे प्रेम अबाधित आहे, तर दोघांची केमिस्ट्रीही अप्रतिम आहे. गुरमीत आणि देबिनाने 'रामायण' या मालिकेत एकत्र काम करून लोकप्रियता मिळवली. 2008 च्या या शोने दोघांनाही प्रेक्षकांची पसंती मिळवून दिली. आता दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत.

देबिनाने केलं मुंडन 

देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी 'शुभ बिजॉय' नावाच्या लघुपटात एकत्र काम केले आहे. दोघांनी ही शॉर्ट फिल्म बिग बँग नावाच्या OTT प्लॅटफॉर्मसाठी बनवली आहे. चित्रपटाची कथा एका मुली आणि मुलाची आहे, जे प्रेमात पडतात आणि आनंदाने जगत असतात, जेव्हा एखाद्या अपघातामुळे सर्व काही बदलते.

या लघुपटातून देबिनाने तिचा लूकही शेअर केला आहे. देबिना बॅनर्जीने तिच्या व्यक्तिरेखेसाठी टक्कल केल्याचं दिसत आहे. जरी तिने हे प्रत्यक्षात केले नाही, परंतु मेकअपच्या मदतीने स्वतःचे संपुर्ण केस काढल्याचं दाखवले आहे. त्याचबरोबर अपघातानंतर गुरमीतचे पात्र आंधळे असल्याचं दाखवण्यात आलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गुरमीत-देबिना जोडी 'शुभ बिजॉय' या शॉर्ट फिल्मद्वारे जवळजवळ 11 वर्षांनंतर एकत्र पडद्यावर परतली आहे. या दोघांनी पुन्हा एकदा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये त्यांच्या लग्नाचे दिवस पुन्हा अनुभवले. या चित्रपटासाठी एक बंगाली विधी विवाह सीन शूट करण्यात आला. हा लघुपट राम कमल मुखर्जी यांनी बनवला आहे.