Debina Bonnerjee तिसऱ्यांदा प्रेग्नंट? एका वर्षात दोन मुलींच्या जन्मानंतर देबिना पुन्हा ट्रोल

Debina Bonnerjee Third Pregnancy : देबिनाचा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला एका वर्षात तिसऱ्यांदा प्रेग्नंट म्हणत ट्रोल केलं आहे. 

Updated: Feb 25, 2023, 02:35 PM IST
Debina Bonnerjee तिसऱ्यांदा प्रेग्नंट? एका वर्षात दोन मुलींच्या जन्मानंतर देबिना पुन्हा ट्रोल title=

Debina Bonnerjee Third Pregnancy : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) आणि गुरमीत चौथरी (Gurmeet Choudhary) हे नुकतेच आईवडील झाले आहेत. गेल्या वर्षी हे दोनवेळा देबिनानं तिच्या मुलांना जन्म दिला आहे. सगळ्यात आधी 3 एप्रिल रोजी आणि 11 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या मुलीला जन्म दिला. देबिना पहिल्या मुलीची आई आईवीएफच्या माध्यमातून झाली होती. गेल्या 7 महिन्यात देबिना 2 वेळा प्रेग्नंट राहिली. तिच्या दुसऱ्या मुलीचा जन्म तर प्री-मॅच्युअर आणि सी-सेक्शनच्या माध्यमातून झाला. त्यानंतर देबिना सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. नुकताच देबिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

देबिनानं तिच्या ब्लॉगमध्ये बाळाच्या जन्मानंतरच्या लठ्ठपणा विषयी किंवा पोट कसं मोठं राहतं याविषयी सांगितलं आहे. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी देबिला तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे का असा सवाल केला आहे. त्यामुळे देबिना एका वर्षात तीनवेळा प्रेग्नंट झाली असे बोलले जाऊ लागले. अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की देबिनाचे आधी पोट दिसत नव्हते आणि आता ते दिसू लागले आहे. दिविशाच्या जन्मानंतर देबिना हेवी वर्कआऊट करत होती, त्यामुळे तिचं वजन लगेच कमी झालं होतं. 

हेही वाचा : Alia Bhatt Looks Unhealthy: राहाच्या जन्मानंतर आलियाची ही अवस्था?

खरंतर, देबिनाच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये ती सुरुवातीलाच बोलते की अनेकांना वाटतं की ती बारीक झाली आहे. पण ते सरळ-सरळ खोटं आहे. ते सिद्ध करण्यासाठी देबिनानं तिचं पोट दाखवलं. तिचं पोट आता सुटलं आहे. आता देबिना तिचं वाढलेलं वजन कोणाला दिसू नये यासाठी ती कपडे त्या प्रकारे परिधान करते. देबिनानं या व्हिडीओमध्ये सत्य सांगितलं असलं तरी देखील नेटकरी तिचं पोट पाहून प्रेग्नंट आहे असं बोलत आहेत. काही नेटकऱ्यांनी तर कमेंट करत देबिना तू तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहेस? असा सवाल केला आहे. देबिनानं काही दिवसांपूर्वीच तिच्या दुसऱ्या लेकीसोबतचे फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत 'ही आमची जादुई मुलगी दिविशा आहे... गुड वाईब्स आणि आशीर्वाद नेहमी.' असे देबिनानं कॅप्शन दिलं.  

सलग दोन मुलं हवी आहेत!

2008 मध्ये रामायण मालिकेतून गुरमीत आणि देबिना घराघरात पोहोचले. देबिनाने सीतेची तर गुरमीतने रामाची भूमिका साकारली होती. दोघांनी 2011 मध्ये लग्न केले. लग्नाच्या 11 वर्षानंतर गुरमीत आणि देबिनाच्या घरात लहान पाहुनीचे आगमन झाले होते. जेव्हा देबिना दुसऱ्यांदा गरोदर होती, तेव्हा गुरमीतने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला सलग दोन मुले हवी आहेत. त्याचा मोठा भाऊ आणि तो सुद्धा असेच मागे मागे होते. देवाने देबिनाला पुन्हा आई होण्याचा आशीर्वाद आणि हक्क दिला ही भाग्याची गोष्ट आहे.