NCB चौकशीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर

ड्रग्स प्रकरणी दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशचं देखील नाव समोर आलं आहे.   

Updated: Nov 3, 2020, 02:41 PM IST
NCB चौकशीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर

मुंबई : NCB चौकशीनंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण पहिल्यांदा सर्वांच्या समोर आली आहे. दीपिकाला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं आहे. विमानतळावर टिपण्यात आलेला तिचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दीपिकाने शर्ट ड्रेस घातला आहे. त्यासोबत सफेद स्नीकर्स घातले आहे. मास्क घातल्यामुळे दीपिकाचा चेहरा लपला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण बाहेर आलं. ड्रग्स प्रकरणी दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशचं देखील नाव समोर आलं आहे. 

NCB इंटेरोगेशन के बाद पहली बार नजर आई दीपिका पादुकोण, PHOTO VIRAL

याप्रकरणी  NCBकडून दीपिकाची चौकशी पूर्ण झाली आहे. करिष्मा मात्र गायब आहे. म्हणून तिला पुन्हा एकदा समन्स पाठवण्यात आला आहे. आता NCBने तिची आई मिताक्षरा पुरोहित आणि क्वान टॅलेंट मॅनेजरकडे समन्स पाठवले आहे. ऑक्टोबर महिन्यात एनसीबीने करिश्माला समन्स जारी केले होते. परंतु ती चौकशीसाठी हजर राहिली नाही. ती अद्यापही गायब आहे.

जेव्हा दीपिका तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी गोव्यात व्यस्त होती, तेव्हा तिला चौकशीसाठी मुंबईत बोलवण्यात आले. त्यामुळे शुटिंग सोडून तिला मुंबईत यावे लागले. या चित्रपटामध्ये दीपिका शिवाय सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे देखील भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत आहे.